नाशिक : पोलिसांच्या बाबतीत जनमानसात वेगवेगळे प्रवाह असले तरी त्यांच्यातही कोणासाठी काहीतरी करण्याची भावना व प्रेरणा असते. यातूनच महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींनी नाशिक येथील निरीक्षणगृह व बालगृहाच्या मुलांसाठी ८१ हजाररुपयांची देणगी देत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या पैशातूनच दरवर्षी १२ आॅगस्ट व १२ सप्टेंबर या दिवशीच्या भोजनाची जबाबदारी कायमस्वरूपी स्वीकारली आहे.येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत पोलीस उपनिरीक्षक व पोलीस उपअधीक्षक यांना प्रशिक्षण दिले जाते. यावर्षी येथे ११५ व ११६ या दोन बॅचचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणादरम्यान त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच्या व्याख्यात्यांबरोबर प्रमुख पाहुण्यांना बोलावून त्यांच्याकडून मार्गदर्शन केले जाते.गेल्या महिन्यात निरीक्षणगृह व बालगृहाचे मानद सचिव चंदुलाल शाह यांना व्याख्याता म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना शाह यांनी निरीक्षणगृह व बालगृहाबाबतची माहिती व या ठिकाणची परिस्थिती कथन केली. या ठिकाणी असलेल्या मुलांची मानसिकता काय असते, त्यांना कशा प्रकारे सांभाळावेलागते याचे सविस्तर विवेचन केले.या देणगीची आता मुदत ठेव केली जाणार आहे. यातून येणाऱ्या व्याजातून निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांसाठी खर्च करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथील ८५ मुलांना गणवेशही देण्यात आला आहे.यावेळी पोलीस अकादमीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनय थिगळे, एडीआय राजेंद्र ठाकरे, प्रशिक्षणार्थी मेहबूब तडवी,नामदेव आंगज व हितेश शाह उपस्थित होते.आपुलकीची भावनाशाह यांनी व्याख्यानातून मांडलेली मुलांची परिस्थिती ऐकून प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्यात निरीक्षण व बालगृहातील मुलांबद्दल आपुलकी निर्माण होऊन त्यांनी या मुलांना मदत करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्याप्रमाणे ११५ बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॅप्टनकडे ८१ हजार रु पये गोळा करून दिले व हे पैसे त्यांनी सचिव चंदुलाल शाह यांच्याकडे सुपुर्द केले .
पोलीस प्रशिक्षणार्थींचा वेगळा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:36 AM