शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
2
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
3
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
4
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
5
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
8
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
9
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
10
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
11
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
12
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
13
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
14
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
15
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
16
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
17
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
18
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
19
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
20
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली

गळीत हंगाम सुरू करण्यास अडचणी

By admin | Published: January 03, 2017 10:57 PM

राहुल अहेर : वसाका कार्यक्षेत्रावर कामगारांशी चर्चा

लोहोणेर : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक अडचणीच्या काळात व नोटाबंदीमुळे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास वेळेवर कर्जपुरवठा न झाल्याने वसाकाचा सन २०१६-१७चा चालू गळीत हंगाम सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी अजूनही गळीत हंगाम सुरू करण्याच्या अपेक्षा कायम आहेत. याबाबत लवकरच सर्वांना विश्वासात घेऊन कारखान्याच्या हितासाठी योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आमदार डॉ. राहुल अहेर यांनी देवळा येथील पत्रकार परिषदेत दिली. वसाकाच्या गळीत हंगामाबाबत कार्यक्षेत्रात व सभासदांमध्ये उलट-सुलट चर्चा होत असल्याने याबाबत खरी पार्श्वभूमी जनतेसमोर यावी, या उद्देशाने वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल अहेर यांनी देवळा विश्रामगृहावर पत्रकार परिषद बोलावून कारखाना व्यवस्थापनाची भूमिका स्पष्ट केली. राज्य शासनाचे हमीपत्र, राज्य सहकारी बँकेने केलेल्या थकीत कर्जाचे पुनर्गठन व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेले अर्थसहाय्य यामुळे तब्बल साडेतीन वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर मागील वर्षी वसाकाची चिमणी सर्वांच्या सहकार्याने सुरू करून संपूर्ण राज्यात वसाका पॅटर्नची चर्चा झाली होती.  याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा प्राधिकृत अधिकारी केदा अहेर, अभिमन पवार, सहायक निबंधक संजय गिते आदि उपस्थित होते. दरम्यान, पत्रकार परिषदेअगोदर वसाकाच्या कामगारांनी आमदार डॉ. अहेर यांची भेट घेऊन कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली. (वार्ताहर)