ठळक मुद्देइ.१० वीचा विद्यार्थी दिगंबर हिरामण भोये याने प्रथम क्रमांक पटकावला.
पेठ : मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित अनुदानित आश्रमशाळा, पेठ येथे समाजप्रबोधन या विषयावर आधारित रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.
कोरोना परिस्थितीचे भान ठेवत सॅनिटायझर व मास्कचा वापर करत इ. ९ वी ते १२ वी वर्गातील मुला-मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात इ.१० वीचा विद्यार्थी दिगंबर हिरामण भोये याने ह्यबेटी बचाओह्ण या विषयावर सुंदर चित्र रेखाटून प्रथम क्रमांक पटकावला. रांगोळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शिक्षिका दीप्ती गांगुर्डे, नीता कुवर, मीना पवार, पाटील, साळवे यांनी प्रयत्न केले. मुख्याध्यापक दीपक कणसे पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. एन. एन. बुवा व श्रीमती दळवी यांनी स्पर्धा परीक्षक म्हणून काम पाहिले. (१६ पेठ)