खमताणे : दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणा-या बागलाण तालुक्यातील शेतीव्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रात नेहमीच पाण्याची आस लागलेली असते. दर वर्षीप्रमाणे यंदाही पाण्यासाठी शेतक-यांचा जुगार सुरू असून तालुक्यात सद्यस्थितीत सुमारे सातशे विहिरींचे खोदकाम सुरू आहे. त्यावर सुमारे सुमारे पंचवीस कोटी रुपये खर्ची पडत आहेत.तालुक्यातील एकूण पीक लागवडीचे क्षेत्र ६५ हजार ६४६ हेक्टर असून, त्यापैकी रब्बी हंगामाचे लागवड क्षेत्र केवळ १२ हजार १७० हेक्टर आहे. तालुक्यातील उत्तर-पूर्व भाग दुष्काळी तर पश्चिम-दक्षिण भाग हे कॅनाल क्षेत्राकाठी येतात. तालुक्यातील जमीन पाण्याचा निचरा होणारी असल्यामुळे भूजल पातळीही खोलवर गेली आहे. शेतातील पिकांना पाणी मिळावे, शेत बागायती झाले पाहिजे. यासाठी दरवर्षी पाण्याची टंचाई निर्माण झाली की, शेतक-यांचा विहिरीसाठी शोध सुरू होतो. गेल्या दहा -बारा वर्षात विहिरी आणि असंख्य कूपनलिका खोदल्या जातात. विहिरी व कूपनलिका खोदण्यासाठी कधी कष्टाने हंगामात मिळविलेली मिळकत टाकण्यात येते, तर कधी बँक, सोसायट्यांकडून कर्ज घेऊन पाण्याचा शोध घेतला जातो. पाणी लागले तर शेती बागायती होते. परंतु बाजारभाव धोका देऊन जातो . घेतलेल्या कर्जाचा आकडा वाढत असल्यामुळे आर्थिक स्थिती बिघडते आणि शेतकरी या दुष्टचक्र ात अडकत जातो.५ टक्केच विहिरींना पाणीतालुक्यात १७९ खेड्यांमधुन सुमारे ७०० नव्याने विहीरी खोदल्या जात आहेत. साठ फूट खोलीची विहिर खोदून बांधण्यासाठी सुमारे तीन लाख पन्नास हजार रूपयांचा खर्च लागतो. त्यामुळे दर वर्षी पाण्याच्या शोधासाठी बागलाण तालुक्यात सुमारे पंचवीस रूपयांचा जुगार खेळला जातो. यात राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत अनुदानित विहिरीची संख्या वेगळी आहे . यातील सरासरी ५ टक्के विहिरींना पाणी लागते, तर बाकी शेतक-यांचा खर्च व्यर्थच जात असल्याने कर्जाचा बोजा वाढतच जातो.
बागलाणमध्ये सातशे विहिरींचे खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 4:28 PM
शेतकऱ्यांचा जुगार : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाय
ठळक मुद्देतालुक्यातील एकूण पीक लागवडीचे क्षेत्र ६५ हजार ६४६ हेक्टर असून, त्यापैकी रब्बी हंगामाचे लागवड क्षेत्र केवळ १२ हजार १७० हेक्टर आहे.