ब्राह्मणगाव : शाळेचे कामकाज शिक्षण , गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसुत्रिवर करा, सर्वत्र जग डिजिटल होत आहे त्यामुळे शाळा डिजिटल होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मविपच्या सरचिटणीस नीलीमा पवार यांनी केले . श्रीराम सजन अहिरे विद्यालयात ब्राह्मणगाव, धांद्री येथील ग्रामस्थांच्या लोकसहभागातून डिजिटल वर्गाचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या . अध्यक्षस्थानी मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. संस्थेचे पदाधिकारी आमदार दीपिका चव्हाण ,माजी आमदार संजय चव्हाण, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, चिटणीस सुनील ढिकले, सरपंच सरला अहिरे, यांचे हस्ते दीपप्रजवलन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या वरच्या मजल्यावर डिजिटल वर्गाचे उद्घाटन पवार यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्र मात सुरवातीस मुख्याध्यापिका व्ही बी बछाव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व स्वागत केले. उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष प्रा. के एन अहिरे यांनी शाळेच्या अडचणी मांडत नवीन वर्गखोल्या , शालेय संरक्षण भिंत बांधणी, आवारात फ्लेवर ब्लॉक बसविणे या मागण्या केल्या, कार्यक्र मासाठी ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू अिहरे, यशवंत बापू अहिरे, तालुका सदस्य डाक्टर प्रशांत देवरे, विश्राम निकम, अशोक पवार, भरत कापडणीस, यतीन पगार, जयंत पवार, ज्ञानदेव अहिरे, अरु ण अहिर आदि उपस्थित होते. जाधव यांनी आभार मानले.
लोकसहभागातून डिजिटल वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 1:08 PM