पिंपळगाव बसवंत : डिजिटल युगाची गरज लक्षात घेता महिलांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांसाठी डिजिटल साक्षरता अभियान हाती घेण्यात आले. नाशिक जिल्ह्यात प्रथमच लासलगाव येथे कार्यशाळा घेऊन महिलांना प्रशिक्षित केले.या डिजिटल साक्षरता अभियानाचे उद्घाटन पिंपळगांव मर्चंट बँक हॉल, बॅँक स्ट्रीट येथे महिला आयोगाच्या प्रतिनिधी रोहिणी नायडू यांच्या हस्ते झाले. यावेळी नायडू यांनी मार्गदर्शन केले़ प्रशिक्षणाचे स्वरूप केवळ तोंडी मार्गदर्शनापेक्षा प्रॅक्टिकल लर्निंग्जवर या कार्यशाळेत भर दिला. राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला आयोग विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच अलका बनकर, सदस्य सत्यभामा बनकर, विद्या घोडके, महिला आयोग प्रतिनिधी रोहिणी नायडू, राहुल नायडू, ट्रेनर मानसी रायकर, राजश्री बुरकुले आदी उपस्थित होते.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल साक्षरता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:04 PM