घोटी : येथील जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या वतीने शहरातील धर्मनिष्ठ व धर्मप्रेमी सुश्रावक पारस चोरडिया यांची सुकन्या मुमुक्षू खुशबू बेहेन एवं मुमुक्षू श्वेता बेहेन यांची दीक्षा राजस्थानमध्ये नोखामंडी येथे १८ जुलै रोजी घेण्याचे निश्चित झाले आहे. परमपूज्य गच्छाधिपती प्रकाशचंद्रजी म.सा. यांच्या आशीर्वादाने होणार आहे.
इगतपुरी तालुक्यातील जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या वतीने घोटी येथील दोन तरुणींनी दीक्षा घेण्याची विनंती श्री संघ घोटी यांच्याकडे व्यक्त केली. शहरातील उद्योजक पारस चोरडिया यांच्या दोन्ही कन्या मुमुक्षू खुशबुबेन, श्वेताबेन यांच्या दोन्ही कन्यांना संघपती नंदकुमार शिंगवी व विश्वस्त मंडळांनी गुरुदेव प.पू. प्रकाशचंद म.सा. यांच्याकडे विनंती केली. त्यानंतर गुरुवर्य यांनी दीक्षा घेण्याची आज्ञा दिली. त्या अनुषंगाने १८ जुलै रोजी नोखामंडी जोधपूर येथे दीक्षा विधी समारोह होणार आहे. ४ व ५ जुलै रोजी घोटी जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या वतीने आनंद उमेश दरबार, चोरडिया भवन येथे कार्यक्रम होणार आहे. समारंभात घोटी जैन श्रावक संघाचे संघपती नंदलाल शिंगवी, किसनलाल पिचा नवसुखलाल पिचा, उमेद पिचा, संजय चोरडिया, चांदमल भन्साळी, पंकज भंडारी, डॉ. वालचंद चोरडिया, विजय कर्नावट, विजय पिचा, दीपक चोरडिया व जिल्ह्यातील जैन बांधव उपस्थित राहणार आहेत.
----------------------
दीक्षा विधीला महत्त्व
जैन धर्मामध्ये दीक्षा विधीला सर्वोच्च महत्त्व आहे. खुशबू व श्वेता पारस चोरडिया यांचे वडील २५ वर्षांपासून जैन समाजाच्या स्वाध्याय सेवा दलाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या दोन्ही कन्या दीक्षा घेत असल्याने जैन श्रावक संघ व तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शहरात उद्या दि ४ रोजी संध्या भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार असून दि. ५ रोजी सकाळी ९ वाजता घोटी शहरातून वरघोडा मिरवणूक निघणार आहे.
(०३ घोटी दीक्षा)
030721\03nsk_27_03072021_13.jpg
०३ घोटी दीक्षा