ठळक मुद्देकर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून गळफास
ओझर : निफाड तालुक्यातील दीक्षी येथील रामदास भास्कर शिंदे ( ४५ ) या तरुण शेतकऱ्याने कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून आपल्या मळ्यातील निवारा शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यांच्या एकत्र कुटुंबाची सुमारे ६ एकर शेती होती. कुटुंबावर दीक्षी विविध कार्यकारी सोसायटीचे ७ लाख, ओझर नागरी सहकारी पतसंस्थेचे ९ लाख, सोनेतरण ८ लाख, हातउसने असे सर्व मिळून सुमारे ३५ लाख रुपयांचे कर्ज होते. शिवाय सततच्या नापिकीमुळे त्यांनी या सर्व परिस्थितीला कंटाळूनआपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.