नाशिक : बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करता गेल्या वर्षीचे दर कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होणार असून, बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने व्यावसायिकांकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने रेडीरेकनरच्या दरात सरासरी ५.८६ टक्क्यांची वाढ केली होती. या वाढीत ग्रामीण क्षेत्रात ७.१३ टक्के, तर प्रभाव क्षेत्रात ६.१२ टक्क्यांची दरवाढ करण्यात आली होती. नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात ५.५६ टक्के, महापालिका क्षेत्रात ४.४७ टक्क्यांची वाढ केली होती. आता हेच दर या आर्थिक वर्षासाठी राहणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून, व्यावसायिकांच्या मागणीला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने बांधकाम व्यावसायिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. गेल्या वर्षी नाशिकमध्ये अन्य शहरांच्या तुलनेत सर्वाधिक ९.३५ टक्के वाढ करण्यात आली होती. आता यावर्षी यात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याने हेच दर कायम राहणार आहेत. राज्य व देशात आगामी लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकांचे वारे सुरू झाले असताना सरकारने रेडीरेकनरच्या दरात वाढ केली असती तर त्यातून ओरड झाली असती. त्यामुळे सरकारने सबुरीचा मार्ग स्वीकारत रेडीरेकनरच्या दरांमध्ये कोणतेही बदल क रण्याचे टाळले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येकाला स्वस्त दरात घर उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेलाही बळ मिळणार आहे. त्यामुळे सरकारने रेडीरेकनरचे दर जैसे थे ठेवून बांधकाम व्यवसायासाठी सकारात्मक पाऊल उचलले असल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत.
दिलासा : सर्वसामान्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार रेडीरेकनर निर्णयाचे व्यावसायिकांकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:24 AM
नाशिक : बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करता गेल्या वर्षीचे दर कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देसर्वसामान्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होणार कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याने हेच दर कायम