लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दहा वर्षांपासून मतदारांशी तुटलेला संपर्क व पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे निफाड मतदारसंघात राष्टÑवादीचे उमेदवार दिलीप बनकर यांची वाट प्रारंभापासूनच बिकट दिसते आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला निफाड सहकारी साखर कारखाना बनकर आमदार असतानाच बंद पडल्याचे मतदारांच्या स्मरणात असल्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत भवितव्य आजमावित असलेल्या बनकरांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.निफाड मतदारसंघाने नेहमीच भाकरी फिरविती ठेवली असली तरी, गेल्या दोन निवडणुकीपासून मतदारांनी बनकर यांना पद्धतशीरपणे बाजूला सारून त्यांच्या एककल्ली राजकारणाला पूर्णविराम दिला आहे. एकेकाळी सत्ताधारी पक्षाचे आमदार असतानाही बनकर मतदारसंघातील मूलभूत प्रश्न व समस्या सोडवू शकले नसल्याची मतदारांत भावना आहे. उलट राज्यात, केंद्रात व जिल्हा बॅँकेतही बनकर यांच्या पक्षाची सत्ता असताना निफाड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरलेला निफाड सहकारी साखर कारखाना डबघाईस येऊन बंद पडला. त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याच्या शेकडो कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी बनकर जिल्हा बॅँकेत संचालक होते.जिल्हा बॅँकेने कारखान्याला कर्जपुरवठा न केल्यामुळेच कारखाना बंद पडल्याचे अजूनही मतदार विसरलेले नाहीत. सत्तेत असलेल्या बनकरांनी त्याचवेळी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून कारखाना वाचविण्याची भूमिका घेतली असती तर तालुक्याचे वैभव कायम राहिले असते. आता मात्र त्यांच्याकडून निवडणुकीच्या तोंडावर निफाड कारखान्याचा मुद्दा हाती घेण्यात आला असला तरी, त्यामागचे वास्तव मतदार जाणून आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचाराचा मतदारांवर कितपत प्रभाव पडेल, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.शिवाय बनकर यांच्या कारकिर्दीत झालेल्या मतदारसंघातील कामाची मतदार आता तुलना करू लागले असून, विद्यमान आमदारांचे आव्हान त्यांच्यासमोर कायम आहे. मतदारांसमोर जाताना बनकर यांच्याकडे कोणतेही नवीन मुद्दे नसल्याने ते नेमका काय प्रचार करतील असा प्रश्नही त्यांच्याच समर्थकांना पडल्याचे दिसते. स्वपक्षातही नाराजीचा सूरगेल्या दहा वर्षांपासून बनकर हे राजकीय विजनवासात गेल्यासारखे असल्याने त्यांचा तळागाळातील मतदारसंघाशी संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी करण्यासाठी अनेक इच्छुक व नवीन चेहरे असताना पक्षाने पुन्हा बनकर यांनाच उमेदवारी दिल्याने स्वपक्षात नाराजी तर मतदारही पर्यायांच्या शोधात असल्याचे चित्र आहे.
दिलीप बनकरांना निसाकाचा प्रश्न भोवण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 12:29 AM
नाशिक : दहा वर्षांपासून मतदारांशी तुटलेला संपर्क व पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे निफाड मतदारसंघात राष्टÑवादीचे उमेदवार दिलीप बनकर यांची वाट प्रारंभापासूनच बिकट दिसते आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला निफाड सहकारी साखर कारखाना बनकर आमदार असतानाच बंद पडल्याचे मतदारांच्या स्मरणात असल्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत भवितव्य आजमावित असलेल्या बनकरांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
ठळक मुद्देमतदारांंशी संपर्क तुटला : प्रस्थापितांचे आव्हान कायम