शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

दिरंगाई : शंभर टक्के निधी येऊनही २५ टक्केच कामे पूर्ण

By admin | Published: January 31, 2015 12:22 AM

साखळी बंधाऱ्यांना ‘लालफितीचा बांध’

  नाशिक - आघाडी सरकारच्या काळात दुष्काळ व टंचाई निवारणार्थ तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषित केलेल्या मुख्यमंत्री साखळी बंधाऱ्यातील कामांना जिल्ह्यात निधी असूनही सरकारी लालफितीचा ‘बांध’ आडवा आल्याने मंजूर असलेल्या ४३ साखळी बंधाऱ्यांपैकी अवघी अकराच कामे पूर्ण झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण ४३ कामांसाठी आघाडी सरकारने शंभर टक्के निधी उपलब्ध करून देऊनही प्रत्यक्षात ४० टक्केच निधी स्थानिक स्तर विभागाला प्राप्त झाल्याचे समजते.आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यभरातील टंचाई व दुष्काळ निवारणार्थ राज्यभरात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून साखळी बंधाऱ्यांना मान्यता दिली. त्यात जिल्ह्यात एकूण ४३ साखळी बंधारे मंजूर करण्यात आल्याचे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एम. संधानशिव यांनी सांगितले. या ४३ साखळी बंधाऱ्यांना सीमेंट प्लग बंधाऱ्यांचे स्वरूप होते. त्यानुसार जिल्ह्यात ४३ साखळी बंधारे मंजूर करण्यात आले असून, त्यापोटी शासनाने सुमारे ८ कोटी ५९ लाखांचा निधीही मंजूर केला. त्यानुसार प्रत्यक्षात जिल्हा नियोजन समितीकडे या ४३ साखळी बंधाऱ्यांसाठी ८ कोटी ५९ लाखांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला. या ४३ पैकी ४० साखळी बंधाऱ्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेश काढण्यात येऊन त्यातील आजमितीस ११ साखळी बंधाऱ्यांची कामेही पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र जिल्हा नियोजन मंडळाकडून स्थानिक स्तर विभागाला एकूण मंजूर व उपलब्ध रकमेच्या ४० टक्केच निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने ही अपूर्ण कामांची संख्या २९ च्या घरात पोहोचली. या ४३ पैकी तीन कामांचे कार्यारंभ आदेश तर अद्यापही निघालेले नाहीत. स्थानिक स्तर विभागाला ४० टक्केच निधी उपलब्ध झाल्याचे पाहून ही ४० कामे घेणाऱ्या मक्तेदारांनी मग २९ कामे अपूर्णावस्थेत सोडून दिल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)