शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

‘दमा दम मस्त कलंदर’ रंगला कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:34 PM

दमा दम मस्त कलंदर..., मुहिंजा मारुवडा पधरे पट सुमन..., मुहिंजा यार मिठा... अशा एकापेक्षा एक सरस गीतांसह आयोलाल झुलेलाल... या गीतावरील समूहनृत्याने रंगलेल्या ‘सिन्धीअ जी शान ऐं सुरहाण’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

नाशिक : दमा दम मस्त कलंदर..., मुहिंजा मारुवडा पधरे पट सुमन..., मुहिंजा यार मिठा... अशा एकापेक्षा एक सरस गीतांसह आयोलाल झुलेलाल... या गीतावरील समूहनृत्याने रंगलेल्या ‘सिन्धीअ जी शान ऐं सुरहाण’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.  निमित्त होते, सिंधी भाषा विकास परिषद व नाशिक जिल्हा सिंधी पंचायत फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोनदिवसीय सिंधी भाषा राष्टÑीय परिषदेच्या समारोपाचे. रविवारी (दि.२६) भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात संध्याकाळी ‘...शान ऐं सुरहाण’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने परिषदेचा समारोप झाला. यावेळी शहरातील विविध उपनगरांमध्ये राहणाºया सिंधी समाजाच्या सुमारे शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून आपले कलागुण सादर केले.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गुरूमुख जगवाणी, परिषदेचे अध्यक्ष अजित मन्याल, शीतलदास बालाणी, अर्जुनदास कठपाल, कन्हैयालाल कालाणी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी भगवान झुलेलाल यांना वंदना सादर करण्यात आली. यानंतर गुरू हरियाणी यांनी उपस्थितांमधून १५ ते १७ वयोगटातील मुलांना व्यासपीठावर बोलावून बॉलिवूडच्या हिंदी संवादाचे सिंधी भाषेत भाषांतर सादरीकरणाची स्पर्धा पार पाडली.  यावेळी शालेय मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हरियाणी यांनी सांगितलेल्या संवादाचे सिंधीत भाषांतर केले. दरम्यान, लघुनाटिकेच्या माध्यमातून सिंधी भाषेच्या संवर्धनाचा संदेश मुलांनी देण्याचा प्रयत्न केला. काठेगल्ली परिसरातील मुलांच्या ग्रुपने आयोलाल झुलेलाल... या गीतावर समूहनृत्य सादर करत कार्यक्रमात रंग भरला. त्यानंतर देवळाली परिसरातील मुलांनी जिया मुहिंजी सिंध... या गीतावर नृत्य केले.  नाशिकरोड भागातील मुलांनी समूहगायन सादर केले तर देवळालीच्या मुलांच्या दुसºया ग्रुपने लघुनाटिकेद्वारे सिंधी समाजाचा विवाह सोहळा रंगमंचावर दाखविण्याचा प्रयत्न केला. अशा एकापेक्षा एक सरस गीतगायन व समूहनृत्याने हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. सूत्रसंचालन देवी लखमियानी, मानसी आडवाणी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक