दिंडोरी : तालुका कृषी विभागांतर्गत येणाऱ्या कार्यालयात कृषी पर्यवेक्षक एल. एन. काळे यांना पाचशे रु पयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले,दिंडोरी तालुका कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक एल. एन. काळे यांनी ठिबक सिंचन अनुदान मिळण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाच्या निमित्ताने एका शेतकºयाकडून लाच मागितली होती.दिंडोरी येथील कृषी विभागाच्या कार्यालय परिसरात पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्या शेतकºयाकडून पाचशे रु पये स्वीकारताना रंगेहाथ पकडत काळे यांना अटक केली.या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत दिंडोरी पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, पोलीस हवालदार सुभाष हांडगे, आर आर गीते करीत आहेत.
दिंडोरीत कृषी पर्यवेक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 8:10 PM
दिंडोरी : तालुका कृषी विभागांतर्गत येणाऱ्या कार्यालयात कृषी पर्यवेक्षक एल. एन. काळे यांना पाचशे रु पयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले,
ठळक मुद्देप्रस्तावाच्या निमित्ताने एका शेतकºयाकडून लाच मागितली होती.