वणी : दिंडोरी शहरातील व्यापाऱ्यांच्या गुदामांवर छापा टाकून पोलीस पथकाने ६ लाख ३९ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी दोघा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.दिंडोरी तालुक्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असणारा गुटखा सहजगत्या खुलेआम उपलब्ध होत असल्याची खबर पोलिसांनाहोती. त्यानुसार पोलिसांनी शहरातील दोघा व्यापाºयांच्या गुदामांवर छापा टाकूनगुटख्याचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी राजेंद्र फत्तेचंद अग्रवाल आणि राहुल सुभाष अग्रवाल या दोघा व्यापाºयांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.काही दिवसांपूर्वी मालेगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या पथकाने वणी पोलिसांच्या कार्यक्षेत्रात ३५ लाख रुपयांचा गुटखा पकडला होता. प्रामुख्याने गुजरात व महाराष्ट्र राज्याचे गुटखा कनेक्शन यातून पुढे आले होते. पथकाने पकडलेला गुटखा सापुतारामार्गे महाराष्ट्रात येत असल्याचे निष्पन्न झाले होते. गुटखा पकडल्यानंतर त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. अहवालाची प्रतीक्षा करण्यात येते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग पोलिसांच्या मदतीने गुटखा विक्र ेत्यांवर कारवाई करतात; मात्र तात्पुरत्या स्वरूपाच्या या कारवाईची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जातआहे.जिल्हाभरातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी विशेष पोलीस पथक कार्यान्वित केले आहे; मात्र अद्यापही गुटखा किंग यांच्याविरुद्ध पोलिसांना अपेक्षित कारवाई करता आलेली नाही.
दिंडोरीत दोघा गुटखा विक्रेत्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:40 PM
दिंडोरी शहरातील व्यापाऱ्यांच्या गुदामांवर छापा टाकून पोलीस पथकाने ६ लाख ३९ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी दोघा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.
ठळक मुद्देकारवाई : सहा लाख रुपयांचा साठा जप्त