दिंडोरी : जिल्हा परिषद पंचायत समतिी निवडणुकीसाठी दिंडोरी तालुक्यात अर्ज माघारीच्या दिवशी 62 उमेदवारांनी माघार घेतली असून सहा गटांसाठी 33 तर बारा गणांसाठी 64 असे एकूण 97 जण रिंगणात आहे .कॉंग्रेसमध्ये गेलेल्या पंचायत समतिीच्या सभापती अलका चौधरी शिवसेनेचे तालुकाप्रमुख उत्तम जाधव, शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेल्या माजी जिप सदस्य सुशीला चारोस्कर यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष उमेदवारी केली असून शिवसेनेला सर्वाधिक बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे .आज अर्ज माघारीच्या दिवशी कोण माघार घेणार याची उत्कंठा होती सकाळपासून नेते मंडळी व अधिकृत उमेदवार अर्ज माघारीसाठी प्रयत्नशील होते मात्र त्यात काही अंशी यश आले मात्र सर्वाधिक डमी अर्जच मागे घेतले गेले मात्र प्रमुख इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे न घेता अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. कोणत्याच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज प्रत्यक्ष तहसील आवारात न येता बाहेरून सूत्र हलवले .निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय निकम ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बाबासाहेब गाढवे आदींच्या मार्गदर्शनाखाली तीन वाजेपर्यंत माघारी होवून नंतर निशाणी वाटप करण्यात आली . कॉंग्रेस कडून इच्छुक असलेल्या सभापती अलका चौधरी वैशाली गांगोडे यांनी अिहवंतवाडी गटातून एकनाथ लीलके यांनी कोचरगाव गटातून तर खेडगाव गटातून एबी फॉर्म न मिळालेले शंकर गाडेकर यांनी भाजप पुरस्कृत उमेदवारी केली आहे . तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख उत्तम जाधव यांनी अिहवंतवाडी गण,दिनकर डंबाळे यांनी टिटवे गणातून , संतोष वाघ यांनी मडकीजाम गण तर रघुनाथ आहेर यांनी कोचरगाव गणातून अपक्ष उमेदवारी केली आहे. वणी गटातून शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केलेल्या माजी जिप सदस्य सुशीला चारोस्कर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे .राष्ट्रवादीचे भास्कर पताडे यांनी कोचरगाव गणातून अपक्ष उमेदवारी केली आहे. सर्वाधिक उमेदवार कोचरगाव गटात सात तर सर्वात कमी मोहाडी व खेडगाव गटात चार आहे . गणात सर्वाधिक मडकीजाम गणात नऊ जण रिंगणात आहे तर सर्वात कमी मातेरेवाडी गणात फक्त 3 उमेदवार रिंगणात आहे . कॉंग्रेस शिवसेना व राष्ट्रवादीने सर्व जागांवर उमेदवार दिले असून भाजप गटात पाच व एक गटात पुरस्कृत केला आहे परंतु मातेरेवाडी गणात उमेदवार देता आलेला नाही. (वार्ताहर)
दिंडोरी गट-गणांमध्ये ९७ उमेदवार रिंगणात
By admin | Published: February 14, 2017 12:37 AM