दिंडोरी : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच असून मंगळवारी (दि.२८) पालखेड येथील औषध कंपनीत ४४ कामगार पॉझिटिव्ह निघाले असताना, पाठोपाठ लखमापूर येथे सिमेंट पत्रे व सीट बनविणाऱ्या कंपनीत सहा कामगारांपाठोपाठ तब्बल ४७ कामगार पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसात तालुक्यातील कंपन्यांमध्ये बाधित कामगारांनी शतक गाठले असून कामगारांसोबतच तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लखमापूर औद्योगिक वसाहती मधील सिमेंट पत्रे बनविणाºया एका कंपनीत सोमवारी (दि.२८)सहा कामगार पॉझिटिव्ह आले होते. त्या पाठोपाठ तब्बल ४७ कामगार पॉझिटिव्ह आले आहे. त्यात तालुक्यातील ६ जणांचा समावेश असून दिंडोरी शहरातील ५ तर बोपेगाव येथील एक कामगारांचा समावेश आहे.तालुका वैद्यकीय यंत्रणेने तातडीने सर्व बाधित कामगारांच्या जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींना विलीगीकरन कक्षात नेले आहे. त्यांचे स्वब घेत तपासणीसाठी पाठवले आहे. अन्य एक कंपनीत ३अवनखेड येथील एक कंपनीत ३ तर पालखेड येथील कंपनीतील ४४ कामगार पॉझिटिव्ह असून ते सर्व नाशिकचे रहिवाशी आहेत.तालुक्यात दोन दिवसात १०३ कामगार पॉझिटिव्ह आल्याने कामगार वर्गासोबत तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासकीय यंत्रणेवर ताण वाढला आहे.
दिंडोरी औद्योगिक क्षेत्रात दोन दिवसात बाधित कामगारांचे झाले शतक पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 6:29 PM
दिंडोरी : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच असून मंगळवारी (दि.२८) पालखेड येथील औषध कंपनीत ४४ कामगार पॉझिटिव्ह निघाले असताना, पाठोपाठ लखमापूर येथे सिमेंट पत्रे व सीट बनविणाऱ्या कंपनीत सहा कामगारांपाठोपाठ तब्बल ४७ कामगार पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसात तालुक्यातील कंपन्यांमध्ये बाधित कामगारांनी शतक गाठले असून कामगारांसोबतच तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देएकाच कंपनीत पुन्हा आढळले ४७ रु ग्ण : भीतीचे वातावरण