प्रारंभी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब जाधव, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष अनिल देशमुख, प्राचार्य बी. जी. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर विलास देशमुख ,सीताराम जाधव, उपमुख्याध्यापक यू. डी. भरसठ, पर्यवेक्षक यू. डी. बस्ते आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपशिक्षिका दीपाली चव्हाण यांनी ‘राजांचे व्यवस्थापन अन् नियोजन कौशल्य’ या विषयावर विचार व्यक्त करताना पूर्वजांचा हा जाज्वल्य इतिहास जिवंत ठेवण्यासाठी गडकोटांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.
संगीत शिक्षिका अपर्णा देशपांडे यांनी ‘इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर...’ हे गीत सादर केले. जाधव यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन सर्वांनी कामकाज करावे, असे आवाहन केले.
यावेळी देशमुख यांची पिंपळगाव केतकीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पर्यवेक्षक बी. बी. पूरकर, के. एस. वारुंगसे , शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष कथार यांनी, तर आभार सुमन विरकर यांनी मानले.
190221\19nsk_39_19022021_13.jpg
दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कुलमध्ये शिवजयंती कार्यक्रमप्रसंगी बाळासाहेब जाधव, अनिल देशमुख, प्राचार्य बी. जी. पाटील आदी.