दिंडोरी : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्र्थ भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला दिंडोरीत उस्फुर्त प्रतिसाद मिळत कडकडीत बंद पाळण्यात आला . शहरातून मोर्चा काढत दिंडोरी चौफुलीवर काही काळ रास्ता रोको करण्यात आला. येथे आंदोलनकर्त्यांच्यावतीने तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे नितीन भुजबळ, रिपाई आठवले गटाचे अध्यक्ष सागर पगारे, मनोज गवारे, चंद्रकांत गवारे, चंद्रकांत पगारे आदींची भाषणे झाली. भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्यात येऊन दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी सागर गायकवाड, रत्नाकर पगारे, उमेश पगारे, शंकरराव गांगुर्डे, जयेश गांगुर्डे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती दिंडोरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. दिंडोरी येथे सर्व शाळा महाविद्यालय सुरळीत सुरू होते. सकाळी दिंडोरीत विद्यार्थ्यांना घेऊन बस आल्या मात्र नंतर बससेवा बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचा व विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला. बस सुरू होईल या आशेवर विद्यार्थी बसस्थानकात थांबून होते. दुपारनंतर मानव विकास च्या बसची वाहतूक सुरू करून विद्यार्थ्यंची सोय करण्यात आली. नाशिक दिंडोरी वणी या मार्गावरील खाजगी प्रवासी वाहतूक सेवा बंद होती.दिंडोरी बंदच्या हाकेला व्यापाºयांनी उस्फुर्त प्रतिसाद देत आपले दुकाने बंद ठेवले. भाजी बाजारातील विक्र ेत्यांनीही दुकाने बंद ठेवले बाजारात शुकशुकाट होता.
दिंडोरीत मोर्चा, काही काळ रास्ता रोको, बससेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 1:01 PM