दिंडोरी : नगरपंचायत कर्मचारी किमान वेतन व फरक याबाबत कामगार उपायुक्त एस.जे. शिर्के यांच्याकडे बैठक झाली. यावेळी कामगार उपायुक्त शिर्के यांनी किमान वेतन देण्याची सूचना मान्य केली.याबैठकीत मुख्याधिकारी येवले यांनी कर्मचारी वर्गवारी देण्याची मागणी कामगार उपायुक्त यांच्याकडे केली. त्यास त्यांनी अनुमती दिली. दिंडोरी नगर पंचायत कर्मचाऱ्यांना ४ जुलै २०१५ नगरपंचायत स्थापनेपासून फरक मिळावा अशी मागणी केली होती. नगरपंचायतीकडे कोरोना पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थिती नसल्याचे मुख्याधिकारी येवले यांनी सांगितले. त्यावर शिर्के व काकडे यांनी टप्प्या टप्प्याने फरक देण्यास सांगितले. यावर सहमती झाली.याबैठकीत किमान वेतन प्रश्नी सीताराम ठोंबरे, काकडे, राजेंद्र शिंदे, भारत कापसे, नितीन गांगुर्डे यांनी मुख्याधिकारी नागेश येवले यांच्याशी चर्चा केली.यावेळी विजय केदारे, संपत शार्दूल, कमलेश गांगुर्डे, नरेंद्र पगारे यांच्यासह नगरपंचायत आस्थापना अधिकारी मावळकर, बाळासाहेब दंडगव्हाळ, अमोल मवाळ आदी उपस्थित होते. नगर ग्रामपंचायतकालीन सर्व नगरपरिषद नगरपंचायत किमान वेतन घोषणेनंतर फरकास व दरवर्षी सर्विस बुक पगार स्लिप देणे आदी मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या.
दिंडोरी नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्याफरकासह किमान वेतणांचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 8:39 PM
दिंडोरी : नगरपंचायत कर्मचारी किमान वेतन व फरक याबाबत कामगार उपायुक्त एस.जे. शिर्के यांच्याकडे बैठक झाली. यावेळी कामगार उपायुक्त शिर्के यांनी किमान वेतन देण्याची सूचना मान्य केली.
ठळक मुद्देटप्प्या टप्प्याने फरक देण्यास सांगितले.