शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
2
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
3
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
4
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
5
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
6
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
7
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
8
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
9
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
10
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
11
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
12
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
13
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
14
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
15
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
16
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
17
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
18
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
19
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
20
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?

दिंडोरीरोडला वाहनतळाचे स्वरूप; अपघातांत वाढ

By admin | Published: November 21, 2015 11:57 PM

बाजार समितीच्या वाहनांची पडते भर

पंचवटी : दिंडोरीरोड ते महालक्ष्मी चित्रपटगृहासमोरील रस्त्यावर दिवसभर चारचाकी, तसेच प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी राहत असल्याने या रस्त्याला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भर वाहतुकीच्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच, शिवाय अपघातांतदेखील वाढ झाली आहे.विशेष म्हणजे दिंडोरी नाका परिसरात वाहतूक शाखेने वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले असले तरी या कर्मचाऱ्यांचे रस्त्यावरच उभ्या राहणाऱ्या चारचाकी व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे लक्ष वेधले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दिंडोरीरोडवर कृषी उत्पन्न बाजारसमिती असून सायंकाळच्या सुमाराला तर शेकडा वाहने भाजीपाला घेऊन बाजारसमितीत येत असतात. भाजीपाला विक्री केल्यानंतर वाहनचालक सदर वाहने रस्त्यावरच उभी करतात. रस्त्यावर उभी राहणारी वाहने व त्यातच भाजीपाल्याची वाहने यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते. गेल्या अनेक दिवसांपासून अशी परिस्थिती असली तरी याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने सध्या तरी या रस्त्याला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र दिसून येते. रस्त्यावरच उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे व त्यातच वेगाने दुचाकी चालविणाऱ्या तरुणांमुळे रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)