शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

दिंडोरी तालुक्यात 287 रु ग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 6:32 PM

दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात कोरोना ने अगोदर च्या काळात आपले रौद्र रूप धारण करून रग्णाची संख्या वाढत नेली होती. परंतु तालुका आरोग्य विभागाने वेळीच नियोजन करत कोरोना प्रार्दूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास रोखण्यात यश मिळवले असून 287 रु ग्ण बरे झाले आहे.

ठळक मुद्देतात्काळ उपचार केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात कोरोना ने अगोदर च्या काळात आपले रौद्र रूप धारण करून रग्णाची संख्या वाढत नेली होती. परंतु तालुका आरोग्य विभागाने वेळीच नियोजन करत कोरोना प्रार्दूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास रोखण्यात यश मिळवले असून 287 रु ग्ण बरे झाले आहे.शहरी व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना चे वातावरण व्यापक झाले होते. प्रत्येक तालुक्यात ही एक प्रकारे डोकेदुखी बनली होती. त्यात दिंडोरी तालुका ही मागे नव्हता. तालुक्यात अनेक रग्ण सापडत होते. तसेच या कोरोनाने दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राला आपले लक्ष केंद्रित करून औद्योगिक क्षेत्राला विळखा मारला होता. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या तोंडाचे पाणी पळाले होते. परंतु या कामी प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार यांचे मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ कोशिरे व त्यांचे सर्व कर्मचारी कोरोना योद्धाच्या रूपाने नागरिकांची सेवा, जनजागृती करून कोरोनाला पायबंद करीत होते.तालुक्यात कोरोनाने खेडी पाडी, गल्ली बोळ वेगवेगळ्या कंपन्या, आॅफिस इ. मध्ये आक्र मण केले होते. परंतु त्या त्या ठिकाणी आरोग्य विभागाने आपली तत्परता दाखवत त्यावर पायबंद घालण्याचा प्रयत्न केला व रग्णाची कशी सुटका होईल. यासाठी योग्य दिशेचा स्विकार करून मदतीचा हात दिला. त्यामुळे दिंडोरी तालुक्यात कोरोना रु ग्णांची वाढलेली संख्या कमी होत गेली. आज अनेक रग्ण उपचार घेऊन पुर्णपणे बरे झाल्याने आनंद व्यक्त करीत आहे. तर काही वर तात्काळ उपचार केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.दिंडोरी तालुका कोरोनो आकडेवारी पुढील प्रमाणे -1)आता पर्यंतचे एकुण पॉझटिीव्ह रग्ण:- 3562)आता पर्यंत चे एकुण बरे झालेले रग्ण:- 2873)आता उपचार घेत असलेले एकुण रग्ण:- 584)आता पर्यंत कोरोना ने मृत्यू पावलेले एकुण रग्ण:- 11

जनतेमध्ये केलेली वेळोवेळी आरोग्य जनजागृती व शासकीय नियम पाळून जनतेला जागरूक राहाण्यासाठी प्रयत्न केले. त्याला आमच्या सर्व कर्मचारी वर्गाने चांगली साथ दिली. व नागरिकांनी सर्व शासनाने दिलेले लॉक डाऊनचे नियम पाळल्यामुळे आम्हाला कोरोनावर पायबंद करता आला आहे.- डॉ.सुजित कुमार कोशिरे, तालुका आरोग्य अधिकारी, दिंडोरी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल