शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

दिंडोरी तालुक्यात विक्र मी १३१ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:51 AM

दिंडोरी : तालुक्यात संततधार सुरू असल्याने धरणे भरली असून, धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देअनेक नदी नाल्यांचे पूल पाण्याखाली गेल्याने दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले.

दिंडोरी : तालुक्यात संततधार सुरू असल्याने धरणे भरली असून, धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.गेल्या नऊ तासांपासून सलग पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने सर्वत्र दाणादाण झाली आहे. रविवारी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी १३१ मिमी पाऊस पडला आहे. या पावसाने शेतीचे मोठे नुकसान होत असून, अनेक नदी नाल्यांचे पूल पाण्याखाली गेल्याने दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले.सकाळी सहा ते दुपारी तीनपर्यंत पडलेला पाऊस :सर्कलनुसार दिंडोरी : १३१.०० मिमी., वणी : ६९.०० मिमी. उमराळे : १३८.०० मिमी., कोशिंबे : ११०.०० मिमी. वरखेडा : ६२.०० मिमी., ननाशी : १४३.०० मिमी., मोहाडी : ६०.०० मिमी. इतका पाऊस पडला असून, दिंडोरी तालुक्यातील सहा धरणांपैकी करंजवण ९४ टक्के विसर्ग २३९५० क्यूसेक, पालखेड ७० टक्के विसर्ग ६३९७० क्यूसेक, वाघाड १०० टक्के विसर्ग १०८४२ क्यूसेक, पुणेगाव ९० टक्के विसर्ग ५६७३ क्यूसेक; फक्त ओझरखेड व तिसगाव ही दोन्ही धरणे काही प्रमाणात भरली आहे.वाघाड उजवा कालवा फुटलादिंडोरी तालुक्यातील वाघाड धरण १०० टक्के भरल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. या धरणातून येणाऱ्या वाघाड उजवा कालवा मडकीजाम येथील कामाले वस्तीजवळ फुटल्याने त्याजवळून धामण नदी असल्यामुळे कालव्याचे पाणी नदीपात्रात जात असल्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी हा कालवा फुटला होता. त्यानंतर प्रशासनाने दुरु स्ती केली; पण रविवारी पुन्हा त्याठिकाणी कालवाफुटल्याने नदीत पाणी वळाले व हानी टळली आहे.नाशिक वणी रस्ता तब्बल नऊ तास बंदनाशिक-वणी रस्त्यावर वलखेड फाट्याजवळ कोळवन नदीवरील पुलावर पुराचे पाणी आल्याने सकाळी दहाच्या दरम्यान बंद झाली. त्यानंतर दिवसभर पाऊस सुरू राहिल्याने वाहतूक बंद होती. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर पाणी ओसरून सायंकाळी ७ च्या दरम्यान वाहतूक सुरू झाली. दिंडोरी बाजूने दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे व त्यांचे सहकारी तर वलखेडच्या बाजूने वणीचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवत बघ्यांना दूर रोखले. वणी सुरगाणा कळवण सप्तशृंगगड जाणाºया बस व खासगी वाहने नाशिककडे परत गेले तर काही पर्यायी मार्गाने गेले; मात्र गुजरात परिवहनच्या बस दिंडोरीत उभ्या होत्या प्रवाशांचे यामुळे हाल झाले जड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.