दिंडोरी : उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गंत कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास योजना राबविण्यात जिल्हात दिंडोरी तालुका अव्वल आहे. तालूका कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेवून आधूनिक पध्दतीने यांञीकी शेती करावी, असे प्रतिपादन आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले.अहिवंतवाडी येथे उन्नत शेती,समृध्द शेतकरी मोहिम व एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेतंर्गत ट्रँक्टर व कृषी अवजारे वितरण प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, अभियानांतर्गंत योजनेतंर्गत ट्रँक्टर, भात सोंगणी यंञ, रोटाव्हेटर, भात मिल, व शेती अवजारांचे वितरण करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत शेतकरी बांधवानी यांञीकरणाचा जास्तीत जास्त अवलंब करून आधूनिक पध्दतीने शेतीव्यवसाय करून उन्नती साधावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ट्रँक्टर व कृषी अवजारांचे वितरण करण्यात आले.तहसीलदार बाबासाहेब गाढवे,उपविभागीय कृषी अधिकारी दिलिप देवरे, पंचायत समीती सभापती एकनाथ गायकवाड, उपसभापती उत्तम जाधव, तालूका कृषी अधिकारी विलास सोनवणे, सरपंच निर्मला गवळी व्यासपीठावर उपस्थित उपस्थित होते. तालूकाकृषीधिकारी विलास सोनवणे यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की, योजनेतंर्गत १२ ट्रँक्टर, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ४९, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत २९ असे ९० ट्रँक्टर व एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेतंर्गत ७२ ट्रँक्टर देण्यात आले आहे. प्रास्ताविक के. एम. जाधव, व सूत्रसंचालन एस. वाय. सावंत यांनी केले. यावेळी सदू गावित, अनंत चौधरी, गंगाधर निखाडे, गोपीनाथ पाटील, सम्राट राऊत, बाबूराव भुसार, पंडित बागूल, शिवाजी महाले, संजय उगले, भाऊसाहेब आहेर, किरण घुगे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी डी. व्हि. पगार, ए. आर डोखळे, बी. पी. निकम, श्रीमती बोंडे, श्रीमती भंडारे, श्रीमती पी. एस. गावीत, ए. यू. अहिरे, आर. एन. बिगूल, पी. के. माळी, एस. आर. दिलाने, ठोकले, फालक आदींनी परिश्रम घेतले.शेततळ्यासाठी अनुदान उपलब्धगळीतधान्य विकास योजनेतंर्गत ७५,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत १५ असे ११७ कृषी अवजारे वितरण करण्यात आले आहे. कांदा चाळ, शेततळ्यासाठी प्लास्टिक कागद अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. पॉलिहाऊस, शेडनेट, सामूहिक शेततळे, मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन योजनेतंर्गत ६०२ हेक्टर साठी ८१०लाभार्थींना २.३०कोटी निधी वाटप करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली.
फलोत्पादन विकास योजनेत दिंडोरी अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:38 AM
दिंडोरी : उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गंत कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास योजना राबविण्यात जिल्हात दिंडोरी तालुका अव्वल आहे. तालूका कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेवून आधूनिक पध्दतीने यांञीकी शेती करावी, असे प्रतिपादन आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले.
ठळक मुद्देतालुक्याचा बहुमान : विविध योजनेतंर्गत ट्रँक्टर व कृषी अवजारांचे वितरण८१०लाभार्थींना २.३०कोटी निधी वाटप करण्यात आले