सिन्नर शहरातून पायी दिंड्या नाशिककडे रवाना होत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा ३१ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. यात्रेसाठी राज्यातील विविध भागातून लाखो भाविक येत असतात. निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी पायी दिंड्या जाण्याची परपंरा आहे. गेल्या दोन दिवसापासून त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी सिन्नर शहरातून शेकडो दिंडया मार्गस्थ होत आहे. सजविलेल्या आकर्षक रथावर निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका व प्रतिमा ठेवलेली असते. तसेच महिला भाविकांच्या डोक्यावरील तुळस सगळयांचे लक्ष वेधून घेत आहेत. नांदूरशिंगोटे हे गाव नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे मोठया प्रमाणात पालखी सोहळा घेवून जाणाऱ्या दिंड्या मुक्कामी होत्या. भाविकांना चहा व नाष्टा तसे सकाळी व रात्री अन्नदानाची सोय ग्रामस्थांकडून केली जाते. महामार्गावर असणा-या गावात सर्वच ठिकाणी भाविकांच्या विसाव्याची सोय केली जाते. पहाटे पाच वाजल्यापासूनच रस्त्याने वारकºयांकडून भजने सुरु होतात. त्यामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. .पायी दिंडीचे ग्रामस्थांंकडून ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे.
दिंड्यानी फुलला महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 5:44 PM