रेडगाव खुर्द : पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने डाळींबबागांची लागवड केली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेततळे केले. सूक्ष्म सिंचनाचा वापर केला. परंतु वर्षागणिक पावसाचा लहरीपणा वाढत जाऊन टंचाईची झळ तीव्र होत गेली. अखेर पाण्याअभावी शेकडो शेतकऱ्यांच्या बागा पाण्याअभावी करपल्या आहे. अनेकांनी बागा तोडूनदेखील टाकल्या आहेत.तालुक्यात खरीप व रब्बी या दोन मुख्य हंगामातच शेती होते. त्यातही पावसाची टांगती तलवार कायम आहे. पाटपाण्याचे गाजर हे ४० वर्षांपासून दाखवले जात आहे. निवडणुका आल्या की तेच गाजर दाखवले जाते. त्यामुळे लाल कांदा हे येथील शेतकऱ्यांचे अर्थार्जनाचे नगदी पीक बनले आहे. त्याने कितीही रडवले तरी त्याला सध्यातरी हुकमी पाण्याअभावी पर्याय नाही. अशाही परिस्थितीत कसमा पट्ट्यातील यशस्वी डाळींब शेती पाहून कमी पाण्यावर तग धरणारे तसेच तीन हंगामात फळ घेता येते. गेल्या चार-पाच महिन्यापासून पाणी नाही तसेच पाऊसही लांबल्याने शेतकऱ्यांंच्या डाळींबबागा पाण्याअभावी करपल्या आहे. परिणामी डाळींब बागेवर सुखी स्वप्नावर टंचाईचे पाणी फेरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचा अपेक्षाभंग झाला आहे. पावसाची अनियमितता, अत्यल्प हजेरी, लांबलेला पाऊस यामुळे शेकडो एकरावरील डाळींबबागा करपल्या आहे, तर अनेकांच्या बागांना तेल्यानेही ग्रासले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी बागा तोडून टाकल्या आहे. यात श्रम, शेतीचे दोन-तीन हंगाम, खते, सिंचन यांचा खर्च वाया गेला आहे. पन्हाळे येथील नऊ-दहा शेतकऱ्यांंनी बागा तोडल्या आहे तर अजूनही शेतकऱ्यांनी पाऊस येईल, या वर्षी चांगला होईल या आशेवर डाळींबबागा ठेवल्या आहे. डाळींब पीकला अधिक पाणी लागते या अनुमानाप्रत शेतकरी आले आहे. काही शेतकऱ्यांनी डाळींबबागेच्या तुलनेत द्राक्षबाग परवडेल, असे सांगितले. (वार्ताहर)
पावसाअभावी डाळींबबागा करपल्या
By admin | Published: July 22, 2014 10:57 PM