नाशिक : योग या विषयावर एकपात्री पथनाट्य स्पर्धेतील लहान गटात नाशिकच्या निरांत सोनवणेने तर मोठ्या गटात दूर्वा उदागे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
सवंगडी संस्थेच्या वतीने दर वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे या वर्षी सातव्या जागतिक योग दिनानिमित्त सवंगडी संस्थेच्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने योग या विषयावर एकपात्री पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
७ ते १० वर्षे आणि ११ ते १५ वर्षे असे दोन गट करण्यात आले होते. पहिल्या ७ ते १० वयोगटाच्या स्पर्धकांना योगाचे महत्त्व त्याचे प्रकार व फायदे असा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नाशिकमधील अभिनेते किरण भालेराव यांनी काम पहिले. कोरोनाच्या काळात उपक्रमांमध्ये खंड पडू नये आणि मुलांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी यासाठी मागील वर्षी वर्षी आणि या वर्षी अशा ऑनलाईन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या संस्थेचे अध्यक्ष नितीन हिंगमिरे यानी दिली. आयोजनासाठी दीपक बैचे, मंगेश भुसारे, संगीता हिंगमिरे, आनंद खरे, शशांक वझे आदींनी परिश्रम घेतले.
इन्फो
स्पर्धेचा निकाल
पहिला गट ७ ते १० वर्षे - निरांत सोनवणे, तृषा मोरे, यक्षराज कावडे
दुसरा गट ११ ते १५ वर्षे - दुर्वा उदागे, प्रचिती अहिरराव, आर्य लिंगायत, स्वप्निल खैरनार