इंदिरानगर : पाथर्डीगाव चौफुलीलगत दिशादर्शक फलक सुमारे एक वर्षापासून धूळखात पडून आहे, त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यातूनच वाहनधारकांना रस्ता चुकून आर्थिक व मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. तातडीने दिशादर्शक फलक लावण्याची मागणी त्रस्त वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.महापालिकेच्या वतीने प्रवाशांना आपल्या इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील प्रत्येक रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना रस्ता माहीत नसल्याने कोणालातरी विचारत आपल्या इच्छितस्थळी पोहोचण्याची मोठी अडचण निर्माण होत असते. त्यांची वेगवेगळ्या मार्गामुळे फसगत होत असते. त्यामुळे चुकीने प्रवासी एखाद्या वेगळ्या ठिकाणी पोहोचतो. शहरांमध्ये नव्याने येणाऱ्या प्रवाशांना कोण कोठे जातो व कुठून जातो हे कळण्यासाठी महापालिकेकडून शहरातील प्रत्येक मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. परंतु सुमारे एक वर्षापासून पाथर्डीगाव चौफुलीलगत दिशादर्शक फलक रस्त्याच्या कडेला धूळखात पडून आहे. त्यामुळे दिवसभर वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. परंतु दिशादर्शक फलक धूळखात पडून असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे, त्यातूनच वाहनधारकांना रस्ता चुकून आर्थिक व मानसिक त्रासाला ही सामोरे जावे लागत आहे.
दिशादर्शक फलक धूळखात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 1:16 AM