दत्ता महाले।येवला : नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे. डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या थेट नगराध्यक्षपद निवडणुकीत भाजपने निसटता विजय मिळविला होता. येत्या काळात राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे काय पडसाद उमटतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.भाजप विरोध हाच एक अजेंटा समोर ठेवून यापुढील काळात राष्टÑवादी व शिवसेना हातात हात घालून काम करते काय यावरच पुढील सत्तेची समीकरणे अवलंबून असणार आहे. राष्टÑवादीचे आमदार व कॅबिनेट मंत्रिपदी पुन्हा विराजमान झालेले छगन भुजबळ, सेनेचे आमदारद्वयी दराडे बंधू आणि ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे ही तीन टोके कशी जुळतात यावरही पालिकेतील राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे. तूर्त दोन वर्षे वेट अॅण्ड वॉचचीच भूमिका बघत बसावे लागणार आहे.२०१६मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप-सेना युती असतानाही भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणण्यात आमदार किशोर दराडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. आता राज्यात सत्तांतर झाले असले तरी स्थानिक पातळीवर भाजप-सेनेच्या संबंधात मात्र फारसा फरक पडल्याचे दिसून येत नाही. मात्र, तब्बल तीन वर्षानंतर पालिकेत विकासकामे होत नसल्याचा सूर आळवत आता राष्टÑवादी, शिवसेना आणि शहर विकास आघाडी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.येवला नगर परिषदेने ३१ आॅगस्ट २०१७ रोजी घेतलेल्या सर्वसाधारण सभेत चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर व इतर आकारणीसंदर्भात ठराव केला होता. भाजप-सेनेची युती असताना आमदार दराडे बंधूंनी भाजपचा नगराध्यक्ष करण्यासाठी आपले कौशल्य वापरल्याने राष्ट्रवादीच्या तत्कालीन उमेदवार उषाताई शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. असे असले तरी दरम्यानच्या काळात माणिकराव शिंदे आणि दराडे यांच्या राजकीय संबंधातील दुरावादेखील कमी झाला आहे. अशा परिस्थितीत पालिकेच्या सत्ताबदलाची शक्यता धूसर आहे.मात्र, येत्या काळात राज्यातील बदललेल्या परिस्थितीचे स्थानिक राजकारणात काय पडसाद उमटतात, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.
जिल्हा परिषदेकडे लक्षजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षणाची सोडत सर्वसाधारण गटासाठी खुली झाली आहे. येवल्यातून सेना आणि राष्ट्रवादीत इच्छुक अधिक आहेत. जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदासाठी कशी खेळी खेळली जाते? याचा प्रभावदेखील येवला पालिकेच्या राजकारणावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून पुढील राजकारणाचीही दिशा निश्चित होऊ शकते.
सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासाला अडथळा करणाऱ्यांविरोधात कोणतीही भूमिका घेण्याची वेळ आली तरी मागे पुढे पाहणार नाही. कोणतीही विकासकामे होत नाहीत. जनतेच्या हितासाठी सर्व सहमतीने प्रत्येक प्रकरणी शहर विकास आघाडी ठोस भूमिका घेत आता सभागृहातून थेट रस्त्यावर उतरणार आहे. पहिला दणका मालमत्ता करवाढी विरोधात देणार आहोत.- रु पेश लोणारी, गटनेता, शहर विकास आघाडी
राष्ट्रवादी कॉँग्रेस विकासात्मक कामासाठी पक्षभेद विसरून नेहमी सोबत राहिली आहे. विकासकामाबाबत नेहमी आक्र मकपणे भूमिका घेतली आहे. अन्यायकारक करवाढीबाबतही आक्रमक भूमिका घेतलेली आहे. यापुढे बदलत्या राजकारणाबाबत वेट अॅण्ड वॉच हीच भूमिका राहील.- डॉ. संकेत शिंदे,गटनेता, राष्टÑवादी