शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नेपथ्यकार, कलादिग्दर्शक अरुण रहाणे यांचे निधन

By admin | Published: June 21, 2017 12:11 AM

साईन बोर्ड पेंटरपासून नाटकांचा नेपथ्यकार ते चित्रपट कलादिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : साईन बोर्ड पेंटरपासून नाटकांचा नेपथ्यकार ते चित्रपट कलादिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास करत यशोकीर्ती मिळविणारे अरुण रहाणे यांचे मंगळवारी (दि. २०) सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे कलाक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. दुपारी नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.रहाणे यांच्या पश्चात पत्नी शकुंतला, दोन मुले प्रसाद व राहुल, सून असा परिवार आहे. अरुण रहाणे यांच्या निधनाचे वृत्त येताच साहित्य व कलाक्षेत्रात शोककळा पसरली. मूळचे नगर जिल्ह्णातील पुणतांबा या गावचे रहिवासी असलेले अरुण रहाणे यांचे प्राथमिक शिक्षण पुणतांबा येथेच झाले. त्यानंतर नगरला त्यांनी प्रगतकला चित्रकला महाविद्यालयात पुढील शिक्षण पूर्ण केले. लहाणपणीच पितृछत्र हरपलेल्या रहाणे यांनी १९८० मध्ये नाशिक गाठले आणि उपजतच चित्रकलेची ओढ असलेल्या रहाणे यांनी नाशकात साईन बोर्ड पेटिंगची कामे सुरू केली. साईन बोर्ड पेटिंगची कामे करत असतानाच त्यांना एकांकिका, राज्य नाट्य स्पर्धा यामध्ये नेपथ्याची कामे मिळत गेली. नाशिकमध्ये ‘तेजस्विनी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना त्यात त्यांनी छोटीशी भूमिकाही साकारली होती. सुमारे २५ हून अधिक नाटकांची नेपथ्यरचना करणाऱ्या रहाणे यांनी पुढे मराठी चित्रपटांमध्ये कलादिग्दर्शकाची भूमिका यशस्वीपणे निभावत सुमारे साठहून अधिक चित्रपटांचे सेट डिझाइन केले. त्यात प्रामुख्याने सावरखेड एक गाव, जत्रा, कवडसा, बकुळा नामदेव घोटाळे, तोचि एक समर्थ, ब्लाइंड गेम, निशाणी डावा अंगठा, सनई चौघडे, राजमाता जिजाऊ, पहिली शेर, दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर आदी चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी तीन हिंदी चित्रपटांचेही कलादिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ‘जत्रा’ चित्रपटातील गाजलेल्या ‘कोंबडी पळाली’ या गीताचे सेट डिझाइन रहाणे यांनीच साकारले होते. कलादिग्दर्शनात त्यांनी सामाजिक, कौटुंबिक, विनोदी, रहस्यमय, ऐतिहासिक असे अनेकविध विषय हाताळले. अनेक नामवंत कलादिग्दर्शकांसमवेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नाशिक विभागीय शाखेचे कोषाध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. उत्कृष्ट कलादिग्दर्शकाचा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या गोदावरी गौरव व जनस्थान पुरस्कारांचीही नेपथ्यरचना त्यांचीच असायची. कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या काही चित्रपटांना नामांकने मिळाली होती तर ‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट कलादिग्दर्शकाचा पुरस्कार लाभला होता. याशिवाय, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनेही त्यांना गौरविले होते. दुपारी नाशिक अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याप्रसंगी साहित्य, कला, नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलावंत, मान्यवर उपस्थित होते.