नगरसुल : येवला तालुक्यातील बाभुळगाव व नगरसुल येथे कोविड १९ सेंटरला आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील व अतिरीक्त संचालक डॉ. सतीश पवार यांनी यांनी नुकतीच भेट देवू तेथील कामकाजाची माहिती घेतली कोविड केअर सेंटर येवला येथे भेट दिली.रु ग्ण घरी परतताना त्यांना मानसिक आधार दिला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी तेथील कामाचा आढावा घेतला. सिव्हील सर्जन डॉ. जगदाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राठोड, डॉ. दिनेश पाटील आदी यावेळी हजर होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांनी ग्रामीण भागातील सर्वे योग्य प्रकारे सुरू आहे असे सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जंगम यांनी योगा वर्ग घेतला तर डॉ. आनंद तारू यांनी सीसीसी सेवा व ट्रीटमेंट बाबत चांगले सादरीकरण केले.डॉ. कातकडे यांनी कॉमोरबीड बद्दल माहिती दिली. डॉ. पळवे यांनी कोविड आॅनलाईन डाटा एंट्री सादरीकरण केली.(फोटो ०९ नगरसुल)
बाभुळगाव येथील कोविड सेंटरला आरोग्य संचालकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 3:03 PM
नगरसुल : येवला तालुक्यातील बाभुळगाव व नगरसुल येथे कोविड १९ सेंटरला आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील व अतिरीक्त संचालक डॉ. सतीश पवार यांनी यांनी नुकतीच भेट देवू तेथील कामकाजाची माहिती घेतली कोविड केअर सेंटर येवला येथे भेट दिली.
ठळक मुद्देडॉ. कातकडे यांनी कॉमोरबीड बद्दल माहिती दिली.