नाशिक : रोख रक्कम व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याजाच्या परताव्याचे आमिष दाखवून एक कोटी २२ लाख रुपयांची फसवूणक केल्याप्रकरणी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेले बुधवार पेठेतील मिरजकर सराफ व गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्सचे संचालक व कर्मचारी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ दरम्यान, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी सरकारवाडा पोलिसांकडे धाव घेतली असून २५ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची शक्यता आहे़ पल्लवी उगावकर-केंगे यांच्या फिर्यादीनुसार रोख रक्कम व सोने तारणावरून दरमहा एक ते दीड टक्के व्याजाचे आमिष दाखवून सराफ बाजारातील मिरजकर सराफ व गंगापूररोडवरील त्रिशा जेम्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संशयित हर्षल नाईक, महेश मिरजकर, अनिल चौघुले, श्रेयस आढाव, सुरेश भास्कर, भरत सोनवणे, वृषाली नगरकर, विजयदीप पवार, प्राजक्ता कुलकर्णी, कीर्ती नाईक यांनी गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले़ त्यांच्या आमिषाला बळी पडून २०१५ पासून अनेक गुंतवणूकदारांनी ठेवी तसेच सोने तारण ठेवले, मात्र परतावा मिळत नसल्याने धाव घेतली़पोलिसांसमोर आव्हानपोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे समजताच संशयित फरार झाले असून, सराफ दुकानही बंद आहे़ पोलिसांनी संशयितांच्या दुकानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, काही संशयित अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करीत असल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, फरार संचालकांना व कर्मचाऱ्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे़
‘त्या’ सराफी पेढ्यांचे संचालक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 1:08 AM