शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

बंडखोरांना थेट मातोश्रीवर पाचारण

By admin | Published: February 10, 2017 10:54 PM

एकलहऱ्याला बंडखोरी कायम?

नाशिक : नाशिक तालुक्यातील एकलहरे गटातून निष्ठावतांना डावलण्यात आल्याने बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेने डॅमेज कंट्रोल सुरू केले असून, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांना शनिवारी (दि. ११) मुंबईला मातोश्रीवर बोलविण्यात आल्याची चर्चा आहे.एकलहरे गटातून खासदारपुत्र अजिंंक्य हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले एकलहऱ्याचे सरपंच शंकर धनवटे यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली होती. शंकर धनवटे यांना उमेदवारी न दिल्याने एकलहरे गावातून शिवसेनेविरोधात बंद पाळण्यात आला होता. पळसे गटातूनही माजी सदस्य संजय तुंगार व पंचायत समिती उपसभापती अनिल ढिकले यांना डावलून उपजिल्हाप्रमुख जगन आगळे यांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या तुंगार व ढिकले यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी चालविली होती. अखेर जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी नाराजांना चुचकारत संजय तुंगार यांच्या पत्नी सविता तुंगार यांना पळसे गणातून शिवसेना पुरस्कृत करण्याचा शब्द देण्यासह अनिल ढिकले यांना जगन आगळे यांचे उपजिल्हाप्रमुखपद देण्याची तयारी दर्शविल्याने दोघांनीही बंडखोरी मागे घेतली. मात्र एकलहरे गटातील शिवसेनेकडून इच्छुक असलेले उमेदवार शंकर धनवटे व एकलहरे गणातून अपक्ष ठरविण्यात आलेले शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांनी बाळासाहेब ठाकरे एकनिष्ठ आघाडी स्थापन करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दाखविल्याने गडबडलेल्या शिवसेना नेत्यांनी धनवटे व म्हस्के यांना गोंजरण्यास सुरुवात केल्याचे समजते. त्यातच तोडगा निघत नसल्याने अखेर मातोश्रीपर्यंत हे प्रकरण गेल्याची चर्चा आहे. तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांना शनिवारी (दि. ११) मातोश्रीवर चर्चेसाठी बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मातोश्रीवर काय निर्णय होतो, यावरच आता एकलहरे गट व एकलहरे गणातील बंडखोरांचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)