शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

‘व्हॉट्स अ‍ॅप’वर गंदी बात

By admin | Published: June 24, 2014 8:24 PM

‘व्हॉट्स अ‍ॅप’वर गंदी बात

 

नाशिक, दि. २४ : अगदी काही वर्षांपूर्वीच ‘व्हॉट्स अ‍ॅप’ या सॉफ्टवेअरचा उदय झाला अन् पाहता पाहता त्याने सर्व तरुणाईला आपल्या कवेत घेतले. संवादाच्या या नव्या तंत्राचा अनेकांना मोठा फायदादेखील झाला; मात्र काही वाट चुकलेल्या युवकांनी याचा वापर चुकीच्या कामांसाठी करण्यास सुरु वात केली आहे. आता तर व्हॉट्स अ‍ॅपवरील ग्रुपच्या माध्यमातून अश्लील फोटो तसेच संभाषण ‘शेअर’ करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने तरुणींनी अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.फॉरवर्ड करणे धोकादायकनवीन तंत्रज्ञानाचा वापर अश्लील संवादासाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. या सॉफ्टवेअरवर मित्रमंडळींचे ग्रुप तयार करून चॅटिंग करता येते; पण काही जण याचा वापर अश्लील मेसेज, फोटो, चित्रफीत पाठविण्यासाठी करीत आहेत. असाच एक प्रकार नाशिकमध्येही घडला. एका मुलीला तिच्या नातेवाइकाने व्हॉट्स अ‍ॅपवर मॅसेज पाठवला व तो पुढे किमान दहा ते पंधरा जणांना पाठव, असे त्यात लिहिले होते. विशेष म्हणजे, यामध्ये अश्लील मजकूर होता. त्या मुलीने तो वाचला म्हणून ठीक, न वाचताच जर पुढे व्हॉट्स अ‍ॅप युजर्सला फॉरवर्ड केला असता तर लोकांनी तिच्याबद्दल काय विचार केला असता याची कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप वापरताना सावधानता बाळगावी. तसेच आलेला मजकूर वाचूनच इतरांना फॉरवर्ड करावा. मुलीही आघाडीवरया सॉफ्टवेअरचा उपयोग फक्त मुलेच करतात असे नाही. मुलीदेखील मोठ्या प्रमाणात याचा वापर करीत आहेत. त्यांचेदेखील ग्रुप आहेत; पण या ग्रुपमध्ये नेमकी कशाची देवाणघेवाण केली जाते, हे पाहिले असता त्याही मुलांपेक्षा वेगळे काही करीत नाहीत, हेच दिसून आले. यामुळे मुलींचादेखील मोठा सहभाग या प्रकरणात दिसून येतो. कुठल्याही तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करण्यापेक्षा त्याचा फायदा कसा घ्यायचा हे शिकता आले पाहिजे तरच तंत्रज्ञान वरदान ठरते.‘व्हॉट्स अ‍ॅप’चा वापर वाढलाआज अनेक जण मोठ्या प्रमाणावर व्हॉट्स अ‍ॅप वापरू लागले आहेत. पोलिसांनादेखील वायरलेसपेक्षा व्हॉट्स अ‍ॅप फायद्याचे ठरत आहे; पण त्याचा दुरु पयोगदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे, यावर मात्र या सॉफ्टवेअर कंपनीकडून काहीही पर्याय नाही, तसेच पोलीस प्रशासनदेखील यामध्ये काही करू शकत नसल्याने अशा दिशाहीन झालेल्या युवकांना थांबवणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येकानेच असे प्रकार थांबविले पाहिजेत.कट्ट्यांवरदेखील व्हॉट्स अ‍ॅपअनेक विद्यार्थी कॉलेज-क्लासच्या नावाने घराबाहेर पडतात; पण कॉलेज-क्लासमध्ये जाण्याऐवजी ते कट्ट्यावर बसून राहतात. त्यांच्या या घोळक्यात अशाच प्रकारच्या चर्चेला उधाण आलेले असते. कोणी कुठला व्हिडीओ, फोटो किंवा एखादा अश्लील एसएमएस शेअर केला याचीच अधिक चर्चा होते. विशेष म्हणजे याकडे पालकांचे दुर्लक्ष होत असल्याने व्हॉट्स अ‍ॅपवर चर्चांना उधाण आले आहे.खोट्या निधन वार्ताफॉरवर्ड करण्याच्या नादात अनेक सन्माननीय व्यक्तींचे निधन झाल्याचे मेसेजेस कुठलीही खातरजमा न करता फॉरवर्ड केल्या गेल्या आहेत. तर काही युजर्स हेतुपुरस्सर अशा प्रकारच्या निधन वार्ता पसरवून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.