येवला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड व शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपांचे पूजन करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांचे मिठाई व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थी संचिता पाडेकर, अनिरुद्ध जगताप यांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याध्यापक अनारसे यांनी इम्फती फाउण्डेशन, सर्वशिक्षा अभियान, जिल्हा परिषद नाशिक व लोकवर्गणीतून सुरू असलेल्या शालेय इमारतीच्या बांधकामाची माहिती दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक संतोष पाडेकर व दत्तू दुघड यांनी शाळेच्या बांधकामासाठी अकरा हजार रुपयांची देणगी दिली. गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, शिक्षणविस्तार अधिकारी सुनील मारवाडी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश दुघड, उपाध्यक्ष विनायक राठोड, सोसायटी अध्यक्ष भागवत राठोड, केंद्रप्रमुख एन. व्ही. केदारे, गोसावी, लांडगे, बहिरम, प्रवीण तळेकर, योगेश गांगुर्डे, अण्णाभाऊ जगताप, शंकर औटी, बंडू दुघड, भारत बोरसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष शिक्षक नितीन कोकाटे यांनी, तर सूत्रसंचालन दादासाहेब बोराडे यांनी केले. संजय सोनवणे यांनी आभार मानले.