पंचवटी : अमृतधाम येथील विडीकामगारनगरला अपंग व विधवा महिलांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मेळावा घेण्यात आला. प्रहार संघटनेच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे होते.मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सुरेश खेताडे, प्रकाश केकाण, कल्पेश कुट्टे, सुभाष जगताप, वाळू ढोमसे, समाधान बागल, शिवाजी वंजारी, जगन काकडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रहार संघटना गेल्या अनेक दिवसांपासून दिव्यांग विधवा महिलांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत आहेत. यापुढे विधवा व दिव्यांग व्यक्तींनी अडीअडचणी संदर्भात संघटनेशी संपर्क साधल्यास संघटनेच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल, तसेच रुग्णांना आणि गरजवंतांना शस्त्रक्रि येसाठी सहकार्य केले जाईल, असे भांगे यांनी यावेळी सांगितले.
विडीकामगारनगरला अपंग व महिला मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:47 AM