नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीत अपंग मतदारांना सामावून घेण्याचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने येत्या ३ डिसेंबर रोजी अपंग मतदार दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी गावोगावच्या अपंग मतदारांचा शोध घेऊन त्यांना लोकशाही व्यवस्था व मतदानातील सक्रियता याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आयोगाने अपंग मतदार दिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाºयांवर सोपविली असून, त्यापार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कार्यालये व अपंगांसाठी काम करणाºया संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक होऊन त्यात जबाबदारीचे वाटप करण्यात आले. अपंग मतदारांचा सत्कार करणे, निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करणे, अपंगांना मतदान केंद्रावर पुरविण्यात येणाºया सोयी, आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या मतदानात अपंगांचा सक्रिय सहभाग वाढविणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे मिसाळ, तहसीलदार गणेश राठोड, मनपा उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, सुनील पाटील, दत्तू बोडके, अनिल भडांगे, मनीषा पिंगळकर, नीलेश पाटील आदी उपस्थित होते.विशेष करून प्रत्येक मतदान केंद्र, विधानसभा मतदार संघ व लोकसभा मतदार संघनिहाय अपंगांना सामावून घेण्यासाठी बीएलओंमार्फत त्यांना ‘मतदार असल्याचा अभिमान-मतदानासाठी’ असे घोषवाक्य असलेले बॅचेस देणार आहेत.
३ डिसेंबरला अपंग मतदार दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:07 AM