खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील कामगार तलाठी सजाच्या ठिकाणी न थांबता सोयीनुसार शहराच्या ठिकाणी थांबून काम पाहात आहेत.तालुक्यातील खंबाळे, भोकणी, खोपडी बुद्रुक, खोपडी खुर्द या चार गावांची सजा खोपडी येथे आहे. गेल्या दोन वर्षांपासून सजाच्या ठिकाणी तलाठी थांबत नाही. सातबारा उतारा आॅनलाइन करण्याचे कारण देऊन शेतकऱ्यांना टाळले जात होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी मान्य केले; परंतु आॅनलाइनची कामे संपलेली असताना सजाच्या ठिकाणी न थांबता सोयीनुसार तहसील कार्यालयाच्या आजूबाजूला आॅफिस थाटल्यागत येथील तलाठी काम करत आहे. शेतकºयांना विविध शासकीय कामांसाठी सातबारा उताºयाची गरज भासते. परंतु तलाठी सहजासहजी भेटत नाही. यामुळे गावातील झेरॉक्स तलाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन सातबारा खाते उतारा देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.सिन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे. यात प्रत्येक खातेदाराला दोन हेक्टरच्या आत अनुदान देण्याची घोषणा केली गेली. तलाठ्यांना सजाच्या ठिकाणी थांबवण्यास सांगावे, अशी मागणी रामचंद्र आंधळे, सुकदेव सोनवणे, म्हाळू आंधळे, बाळासाहेब खाडे, सुकदेव तोंडे, पांडुरंग तोंडे. अण्णा भाबड, संपतराव सांगळे, भागवत आंधळे, निवृत्ती गोफणे आदी शेतकºयांनी केली आहे.शासनाने दुष्काळी भागातील शेतकºयांना दिलासा देण्यासाठी दोन हेक्टरपर्यंत अनुदान देण्याचे जाहीर केले; पण कर्मचाºयांच्या हलगर्जीपणामुळे पात्र लाभार्थींना वंचित राहावे लागत आहे. गावासाठी शासनाने नेमलेला एकही अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहात नाही. गेल्या चार वर्षांपासून एकही शासकीय कर्मचारी ग्रामसभेला हजर राहात नाही. शेतकºयांना, ग्रामस्थांना शासनाच्या योजना माहीत होत नाही. कृषी सहायक, पशुधन विकास अधिकारी, वीज वितरण कंपनीचा वायरमन, वनविभागाचा कर्मचारी, यातील एकही कर्मचारी गावात हजर राहून माहीत देत नाही.- भाऊसाहेब आंधळे, उपसरपंच, खंबाळे
खंबाळेत तलाठी मुख्यालयात थांबत नसल्याने गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 12:20 AM
खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील कामगार तलाठी सजाच्या ठिकाणी न थांबता सोयीनुसार शहराच्या ठिकाणी थांबून काम पाहात आहेत.
ठळक मुद्देएकही कर्मचारी गावात हजर राहून माहीत देत नाही.