नाशिक : महापालिकेच्या आरक्षणांमुळे अनेक भूखंड बाधित झाल्यानंतर विकासकांना टीडीआर किंवा भरपाई पटकन दिली जाते. मात्र शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही. २००३-०४ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यातील सुमारे चाळीस शेतकरी आजही प्रशासनाने दिलेले लेखी पत्र घेऊन राजीव गांधी भवनाचे उंबरठे झिजवत आहेत. अशा शेतकºयांना प्राधान्याने मोबदला अदा करा, असे आदेश स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी गुरुवारी (दि.१९) दिले.समितीची बैठक गुरुवारी पार पडली त्यावेळी राजीवनगर येथील आरक्षित भूखंडाच्या मोबदल्यापोटी ९० लाख रुपये देण्याचा प्रस्ताव होता. त्यावरून जोरदार चर्चा झाली असताना त्यावर निमसे यांनी आदेश दिले. शहरातील शेतकºयांशी वाटाघाडीने जमिनी घेण्यात आल्या, मात्र त्यांना मोबदला दिला गेला नाही. भूसंपादन प्रक्रिया राबविल्यास महापालिकेला मोबदल्याच्या रकमेवर १८ ते २० टक्के प्रत्येक खटल्यात द्यावे लागतील, त्यामुळे अशाप्रकारे आर्थिक बचत करण्यासाठी वाटाघाटीने शेतकºयांना रक्कम अदा करावी, अशा प्रकारचे आदेश निमसे यांनी दिले. दिनकर पाटील यांनी वीस वर्षांपासून मोबदल्यासाठी अडून असलेल्या शेतकºयांना मोबदला दिला जात नाही आणि पीटीसी समोरील वादग्रस्त भूखंड मोफत मिळत असताना मात्र विकासकांना टीडीआर आणि मोबदला दिला जातो, असा आरोप केला.२० फेबु्रवारीपूर्वी अर्थसंकल्पमहापालिकेचा २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी २० फेबु्रवारीपूर्वीच आयुक्त अर्थसंकल्प सादर करतील आणि ३१ मार्चपर्यंत स्थायी समितीने तो मंजूर करावा, असा निवडणूक कार्यक्रम यावेळी संमत करण्यात आला. परंतु, दिनकर पाटील व कल्पना पांडे यांनी अंदाजपत्रकात तरतूद करण्यासाठी याद्या दिल्या जातात आणि त्या मंजूर झाल्यानंतरदेखील कामे केली जात नाही, असा आरोप केला. पाटील यांनी तर महासभेत पुन्हा ठिय्या आंदोलन करण्याची तयारी दर्शविली. आपल्याकडे आता गमविण्यासारखे दुसरे कोणतेही पद नाही, असे सांगतानाच त्यांनी यापूर्वी आपले पद कोणी घालवले त्यांची नावे माहीत असल्याचे सांगितले.‘त्या’ कर्मचाºयाचे निलंबनमहापालिकेत न येता चौदा वर्षे अन्यत्र काम करून वेतन घेणाºया रवि सोनवणे या कर्मचाºयाकडून या कालावधीत वेतन वसूल करण्याची मागणी करण्यात आली. दिनकर पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. सोनवणे यांना निलंबित करण्यात आल्याचे उपआयुक्त मनोज घोडे पाटील यांनी सांगतानाच बहिराम यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बाधित शेतकऱ्यांना प्राधान्याने मिळणार मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:48 AM
महापालिकेच्या आरक्षणांमुळे अनेक भूखंड बाधित झाल्यानंतर विकासकांना टीडीआर किंवा भरपाई पटकन दिली जाते. मात्र शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही. २००३-०४ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यातील सुमारे चाळीस शेतकरी आजही प्रशासनाने दिलेले लेखी पत्र घेऊन राजीव गांधी भवनाचे उंबरठे झिजवत आहेत. अशा शेतकºयांना प्राधान्याने मोबदला अदा करा, असे आदेश स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी गुरुवारी (दि.१९) दिले.
ठळक मुद्देसभापती निमसे यांचे आदेश आधी जुनी प्रकरणे निकाली निघणार