त्र्यंबकेश्वर : १३ नगरसेवकांच्या स्वाक्षरीने प्रस्ताव दाखललोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : नगरपालिकेच्या नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांच्याविरुद्ध १३ नगरसेवकांच्या स्वाक्षरीने शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात तो दाखल करून घेतला असून, नूतन अध्यक्ष निवडीची सभा जिल्हाधिकारी केव्हा बोलवतात याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. गेल्या महिनाभरापासून नगराध्यक्ष व विरोधात गेलेल्या १३ नगरसेवकांमध्ये धुसफूस सुरू होती. प्रारूप आराखडा परस्पर मंजूर करण्याचे प्रकरण, हरित पट्ट्यातील भूखंड पिवळी करणे, मुख्याधिकाऱ्यांना न सांगता आराखड्यावर स्वाक्षरी करून घेण्याचा प्रयत्न करणे, मुख्याधिकारी चेतना मानुरे - केरूरे यांनी जिल्हाधिकारी यांना नगराध्यक्षांचे पती पालिकेत हस्तक्षेप करतात म्हणून नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांचे सभासदत्व रद्द करण्याची केलेली शिफारस आदी प्रकरणावरून तसेच विरोधी नगरसेवकांच्या दृष्टीने बेकायदेशीर व भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी कामे केल्याने अविश्वास ठराव आज दाखल केला गेला. अविश्वास ठरावाचे वादळ गत १५ दिवसांपासून घोंगावत होते. हेतू एवढाच होता की अविश्वास ठरावाची पाळी न आणता राजीनामा द्यावा. शुक्रवारपर्यंत वाट पाहूनही राजीनामा न दिल्याने आज अविश्वास प्रस्ताव दाखल झाला. यापूर्वी पालिकेत नऊ विरुद्ध आठ असे संख्या बळ होते. केवळ एका मताने विजया लढ्ढा यांचा विजय होऊन त्यांनी नगराध्यक्षपद २८ डिसेंबर २०१५ ला स्वीकारले होते. एक वर्षानंतरच या टर्ममधील सहाव्या नगराध्यक्षपदाचा मान तृप्ती धारणे यांना द्यावा, अशी विरोधकांची मागणी होती. १३ नगरसेवक एकत्र आले. डीपी प्रकरण व राजीनामा प्रकरणाचा फायदा उचलून आज अविश्वास प्रस्तावाचे हत्यार उपसले. जिल्हाधिकार्यांकडे आज दाखल केलेल्या प्रस्तावावर नगराध्यक्ष आम्हाला विश्वासात घेऊन काम करीत नाहीतठरावावर योगेश विश्वनाथ तुंगार, रवींद्र शांताराम सोनवणे, यशोदा सुनील अडसरे, अलका राजेंद्र शिरसाट, अंजना मधुकर कडलग, रवींद्र मोहन गमे, सिंधूबाई दत्ता मधे, ललित बाळासाहेब लोहगावकर, अभिजित मधुकर काण्णव, अनघा नारायण फडके, तृप्ती पंकज धारणे, शकुंतला धनंजय वाटाणे, आशा माधव झोंबाड अशा १३ सदस्यांच्या स्वाक्षरीने ठराव दाखल केला आहे.
नगराध्यक्ष लढ्ढा यांच्याविरुद्ध अविश्वास
By admin | Published: June 18, 2017 12:47 AM