यावेळी उपनेते बबन घोलप यांनी, पक्षात साऱ्यानाच पदे हवी असतात, परंतु सर्वांनाच ते देणे शक्य नसते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असे सांगितले, तर जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी भाजपवर तोफ डागून पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपचा काटा काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आल्याचे सांगितले. यावेळी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, रंजना नेवाडकर, विनायक पांडे, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमापूर्वी भालेकर मैदानावर सर्व शिवसैनिकांनी एकत्र जमून फटाक्याची आतषबाजी केली व तेथून वाजत गाजत बागुल, गीते यांना पक्ष कार्यालयात आणऱ्यात आले. त्यांच्यासमवेत पक्षात आलेल्या सर्वांना भगवे फेटे बांधण्यात आले होते.
चौकट====
फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर
या सोहळ्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केल्याने कोरोनाची भीती कोणावरही दिसली नाही. अनेकांनी मास्क लावलेले नव्हते, तसेच कार्यकर्ते एकमेकांना खेटून उभे असल्याने सर्वांनाच फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे दिसून आले.
चौकट===
‘जी’ म्हणण्याची सवय लागली
आपल्या भाषणात सुनील बागुल यांनी व्यासपीठावरील साऱ्यांच्याच नावापुढे ‘जी’ अशी बिरुदावली लावली. आपण ज्या-ज्या पक्षात गेलो, तेथे साऱ्यांनाच जी लावायची सवय होती, ती आपल्याही लागल्याचे सांगताच साऱ्यांनाच हसू आवरले नाही. काही सवयी लागतात, त्या बदलाव्या लागतील, असेही ते म्हणाले.
चौकट===
घरातील भांडणात आमचा काय दोष
वसंत गीते यांनी बोलताना, उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी रुग्णालयात दाखल केल्यावर आपण भेटायला गेलो, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावून सांगितले, ‘काळजी करू नका, तुमच्याशी लढायला मी खंबीर आहे.’ त्यावेळी आपण त्यांना ‘आपल्या घरातील भांडणांमध्ये आम्हाला दोष देऊन काय उपयोग?’ असे सांगितल्याची आठवण करून दिली.