सिन्नर : साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तालुक्यातील बारागाव पिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेण्यात पार पडले.व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. फरताळे, फॉर्च्यून ग्रुपचे संचालक संजय जाधव व त्यांचे सहकारी उपस्थित होते. संजय जाधव यांनी दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या विविध आपत्ती व आपत्तींचे प्रकार यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या आपत्तीपैकी अग्नि व्यवस्थापन कशा प्रकारे करावे हे सांगताना त्यांनी अग्नीची कारणे, अग्नीचे परिणाम व आग विझविण्यासाठी करण्यात येणाºया उपाय योजना यावर सविस्तर माहिती दिली. आगीचे व्यवस्थापन करताना प्रत्यक्ष आग लागल्यानंतर अग्निशामक उपकरणाद्वारे कशी नियंत्रणात आणता येईल याचे प्रात्यिक्षक विद्यार्थ्यांना दाखिवले. या प्रात्यक्षिक प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 5:46 PM