शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

नांदूरमधमेश्वर धरणातून ६ हजार ४५६ क्युसेकने विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 15:26 IST

शहरात शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत २१.१ मिमी इतका पाऊस झाला तर आज रविवारी सकाळपर्यंत ३१ मिमी पावसाची मागील २४ तासांत नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २२.७८ मिमीपर्यंत मागील २४ तासांत पाऊस पडला.

ठळक मुद्देरविवारी दुपारी १२ वाजेपासून ६ हजार ४५६ क्युसेक विसर्ग नांदूरमध्यमेश्वर बंधारा हा पुर्ण क्षमतेने भरला आहे.

नाशिक : शहरासह जिल्ह्यात गेल्या शुक्र वारपासून मान्सून सरींनी जोरदार सलामी सुरू आहे. शनिवारी (दि.१३) जिल्ह्यात २२.७८ मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला. सर्वाधिक पाऊस इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, नाशिक या तालुक्यांमध्ये झाला. नांदूरमध्यमेश्वर धरण हे लघुप्रकल्प असून त्याची क्षमता ५५४ दलघफू इतकी असल्यामुळे या धरणातून शुक्रवारपासून सातत्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रविवारी रात्री बारा वाजेपासून या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. १ हजार ६१४ क्युसेकने झालेला प्रारंभ दुपारी १२ वाजता ६ हजार ४५६क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सातत्याने पावसाची जोरदार सलामी सुरू आहे. तसेचदारणा धरणातून गोदावरी डावा, उजवा आणि जलद कालव्यासाठी ११०० क्युसेक चे आवर्तन सुरू आहे. एकीकडे दारणाचे सुरू असलेले आवर्तन आणि पाणलोटक्षेत्रात होणारा पाऊस यामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधारा लघुप्रकल्पात पाऊसपाण्याची आवक वाढू लागल्याने बंधारा १०० टक्के भरला आहे. यामुळे बंधाऱ्यातून सातत्याने विसर्ग केला जात आहे. यामुळे मराठवाड्याची तहान भागण्यास मदत होणार आहे. गोदापात्रातून हे पाणी थेट जायकवाडीला जाऊन मिळत आहे. शनिवारी रात्री ११ वाजेपर्यत ३ हजार २२८ क्युसेक इतका विसर्ग या बंधाºयातून पुढे केला जात होता. शनिवारी संध्याकाळपर्यंत विसर्ग कमी करत १ हजार ६१४ क्युसेकपर्यंत आणला गेला; मात्र शनिवारी संध्याकाळी शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. शहरात शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत २१.१ मिमी इतका पाऊस झाला तर आज रविवारी सकाळपर्यंत ३१ मिमी पावसाची मागील २४ तासांत नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २२.७८ मिमीपर्यंत मागील २४ तासांत पाऊस पडला. एकूणच वरूणराजाची समाधानकारक कृपादृष्टी मान्सूनच्या आगमनाने होत असल्याने नाशिककरांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.नांदूरमध्यमेश्वर बंधाºयातून रविवारी रात्री १२ वाजेपासून पुन्हा विसर्ग सुरू केला गेला. हळुहळु हा विसर्ग रविवारी दुपारपर्यंत वाढविण्यात आला. ६ हजार ४५६ क्युसेक इतका विसर्ग रविवारी दुपारी १२ वाजेपासून पुढे दुपारपर्यंत कायम होता. संध्याकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्यास विसर्गामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण नांदूरमध्यमेश्वर बंधारा हा पुर्ण क्षमतेने भरला आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून मागील चार दिवसांपासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ४१३ क्युसेक इतके पाणी पुढे गोदावरीत सोडले गेले असल्याची माहिती जिल्ह्याच्या पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. रविवारी रात्रीपासून सुरू असलेला विसर्ग सोमवारच्या एकूण आकडेवारीत ग्राह्य धरला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरRainपाऊसWaterपाणी