नाशिक : नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना टोइंग करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक हायड्रोलिक वाहने दाखल झाली आहेत़ या अत्याधुनिक वाहनांवर असलेल्या सीसीटीव्हीमुळे वाहन बेशिस्तपणे उभे केलेले नव्हते या वाहनमालकांच्या आक्षेपास आता थारा असणार नाही़ याबरोबरच या वाहनावरील हायड्रोलिक प्रणालीमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान टळणार असले तरी बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनधारकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे़शहरात पार्किंगसाठी पुरेशा जागेचा अभाव असल्याने रस्त्यात कुठेही दुचाकी व चारचाकी वाहने उभी राहतात व पर्यायाने वाहतूक कोंडी व अपघातांची संख्या वाढली होती़ यामुळे पोलीस आयुक्तांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये टोइंग ठेकेदार नेमून बेशिस्तपणे रस्त्यावर उभ्या असणाºया वाहनांवर टोइंगची कारवाई सुरू केली. पूर्वीच्या ठेकेदाराची मुदत संपल्याने निविदा काढून नवा टोइंग ठेकेदार नेमण्यात आला आहे़ टोइंग कारवाईदरम्यान ठेकेदाराकडील कर्मचारी व वाहतूक पोलिसांसोबतच वाहनचालकांचे वाद होत असल्याने ते टाळण्यासाठी पोलिसांनी ठेकेदारांना नियमावलींची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांच्या मागणीसाठी टोइंग ठेकेदाराने अत्याधुनिक अशी प्रत्येकी चार टोइंग वाहने मागविली आहे़ त्यामध्ये चारचाकी व दुचाकी उचलण्यासाठी वेगवेगळी वाहने असून, त्याचे प्रात्यक्षिक गुरुवारी (दि़४) पोलीस आयुक्तालयात दाखविणयात आले़ यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. अजय देवरे आणि वाहतूक ठेकेदार समीर शेटे आदी उपस्थित होते़तडजोड शुल्कात वाढटोइंगसाठी आलेल्या अत्याधुनिक हायड्रोलिक वाहनांद्वारे कारवाई केली जाणार असल्याने पूर्वी व आताच्या तडजोड शुल्कात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे़ यापूर्वी दुचाकी वाहनांसाठी शासकीय व ठेकेदार या दोघांचे मिळून १७० रुपये शुल्क आकारले जात होते़ मात्र, तेच आता ३०० रुपये होण्याची शक्यता आहे़ तर चारचाकी वाहनांच्या टोइंगपोटी ६५० रुपये घेतले जाणार असून पूर्वी ४५० रुपये घेतले जात होते़
वाहतुकीला लागणार शिस्त : नो पार्किंगमधील बेशिस्त उभ्या केलेल्या वाहनांना लागणार चाप नाशकात टोइंगसाठी नवीन हायड्रोलिक वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:16 AM
नाशिक : नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना टोइंग करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक हायड्रोलिक वाहने दाखल झाली आहेत़
ठळक मुद्देदुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान टळणारवाहनांवर टोइंगची कारवाई सुरू