नाशिक : मतदानाचा टक्का वाढणे हे जागरूक लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासकीय यंत्रणा आणि नाशिकमधील सेवाभावी संस्था प्रयत्न करीत असताना व्यावसायिकदेखील त्यासाठी सरसावले आहेत. मतदान केल्यानंतर संबंधित मतदाराला टीव्हीपासून अन्य भेटवस्तू तसेच वैद्यकीय चाचण्या आणि कपडे खरेदीसाठीदेखील सवलती देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.मतदानाचा हक्क पवित्र असला तरी अनेकदा त्याबाबत उदासीनता असते. त्यामुळे मतदारांना जाणीवपूर्वक मतदान करण्याचे आवाहन करावे लागते. मतदारांची इच्छा असते; परंतु कंटाळा, सुटीचा दिवस असल्याने मौजमजा आणि अनास्था यामुळे मतदार मतदान करत नाहीत.मात्र, मतदान वाढावे यासाठी शासकीय यंत्रणा यांच्यासह काही संस्थादेखील एकत्रित प्रयत्न करीत असून, ‘व्होट कर नाशिककर’ अशी मोहीम सुरू आहे. त्याला शहरासह जिल्ह्यातील काही व्यावसायिकांनी देखील साथ दिली आहे. अनेक व्यावसायिकांनी बक्षिसे, सवलत योजना आणि सोडत पद्धतीने भेटवस्तू देण्याची योजनाही जाहीर केल्या आहेत.एका पतसंस्थेच्या वतीने मतदानानंतर या पतसंस्थेकडे नाव नोंदविणाऱ्या शंभर भाग्यवान मतदारांना बक्षिसे देण्यात येणार आहे.नाशिक शहरात एका ब्युटीकच्या वतीने मतदान केल्याची खूण दाखविल्यास ग्राहकाला शिलाई त्याचप्रमाणे ड्रेस मटेरियल, रेडिमेड कपडे यावर ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.एका पॅथॉलॉजिकल लॅबने सोमवारी (दि.२१) मतदान केल्यानंतर याठिकाणी कोणत्याही प्रकाराच्या आरोग्य तपासणीवर तब्बल ४० टक्के इतकी सूट देण्याची योजना जाहीर केली आहे.दाढी, कटिंगवर सवलतमतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना घोषित केल्या जात असतानाच सलून व्यावसायिकही मागे नाहीत. एका सलून व्यावसायिकाने मतदान करून येणाºया मतदारास दाढी आणि कटिंग केल्यास ५० टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे.एका व्यावसायिकाने मतदारांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या दुकानात मतदारांनी नोंद केल्यास दुसºया दिवशी (मंगळवारी) सोडत पद्धतीने एका भाग्यवान मतदाराला टीव्ही भेट देण्याची योजना घोषित केली आहे.
मतदान केले तर मिळणार सवलती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:12 PM
नाशिक : मतदानाचा टक्का वाढणे हे जागरूक लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासकीय यंत्रणा आणि ...
ठळक मुद्देव्होट कर नाशिककर : टक्का वाढविण्यासाठी व्यावसायिकांच्याही योजना