कसबे-सुकेणे : येथील बुधवारच्या (दि.२३) दिवाळी सणाच्या बाजारावर निरूत्साहाचे ढग दाटले होते. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे बाजारातील व्यावसायिकांच्या विक्र ीवर परिणाम होवुन बाजारात नैराश्य निर्माण झाले.कसबे सुकेणे येथील आजचा आठवडे बाजार हा दिवाळी सणाचा होता. परीसरातील आठ ते दहा गावांचा हा बाजार असल्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर बाजारात किराणा, कपडे, पुजा, फटाके आदींची दुकाने सकाळी थाटली गेली होती. परंतु सायंकाळी सहानंतर पावसाने हजेरी लावल्याने बाजारात ग्राहकांची संख्या रोडावली. लाखो रूपयांचा माल दिवाळी सणासाठी विक्र ेत्यांनी घेऊन ठेवला पण मालाला मागणी नसल्याने आथिॅक चक्र मंदावले असल्याने विक्रेते ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहेत.शेतमालाचे नुकसान झाल्याने मंदीपावसामुळे दिवाळी सणाच्या उत्साहावर पाणी फिरले असुन, शेतमालाचे नुकसान झाल्याने ग्रामीण भागातील आठवडे बाजारावर परिणाम होत आहे. शेतकरी व मजुर वर्गात निरूत्साहाचे वातावरण आहे.सुकेणेच्या दिवाळी सणाचा बाजारात बुधवारी (दि.२३) पावसामुळे गिºहाईकांची संख्या कमी आहे. यंदा दिवाळी सणाचा उत्साह कमी असल्याचे जाणवतआहे.नुकसान जास्त आहे.- व्दारकाबाई वाडेकर, विक्र ेते, सुकेणे.
दिवाळी सणाच्या बाजारात निरुत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 9:24 PM
कसबे-सुकेणे : येथील बुधवारच्या (दि.२३) दिवाळी सणाच्या बाजारावर निरूत्साहाचे ढग दाटले होते. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे बाजारातील व्यावसायिकांच्या विक्र ीवर परिणाम होवुन बाजारात नैराश्य निर्माण झाले.
ठळक मुद्देबाजारात ग्राहकांची संख्या रोडावली.