देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत शहरात पे आणि पार्क योजना लागू करण्याच्या निर्णयाबाबत येथील व्यापाऱ्यांनी कठोर भूमिका घेत देवळाली व्यापारी मर्चंट असोसिएशनने शहरात करण्यात आलेल्या पार्किंग सुविधेला विरोध नसून त्यामध्ये उभे करण्यात येणाºया वाहनांकडून प्रकारच्या चार्ज आकारू नये याबाबत येथील मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांना निवेदन देण्यात आले आहे.पे आणि पार्कचा हा भार सर्वसामान्य ग्राहक व व्यावसायिकांवर टाकण्यात आला, तर नागरिकांना सोबत घेऊन व्यापारी संघटना बेमुदत बंद किंवा आमरण उपोषण करतील व त्याची संपूर्ण जबाबदारी ही कॅन्टोन्मेंट बोर्डाची असेल. याशिवाय शहरात आधीच व्यावसायिकांचे धंदे ठप्प आहे. यांसह अनेक परिणामांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्यापारी वेल्फेयर असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश कुसाळकर, नितीन गायकवाड, गौतम गजरे, प्रकाश केवलानी आदींनी चर्चा केली.
कॅम्पच्या वाहनतळाबाबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:00 PM