नाशिक : धार्मिक स्थळे बचाव कृती समितीच्या वतीने आमदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर शुक्रवारी रामायण या महापौर निवासस्थानी भाजपाच्या तीनही आमदारांची बैठक पार पडली. यावेळी कृती समितीच्या सदस्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर सोमवारी मुख्यमंत्री आणि आमदार तसेच कृती समिती शिष्टमंडळ यांच्यात बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.महापालिकेच्या अनेक मोकळ्या जागांवर धार्मिक स्थळे असल्याने ही धार्मिक स्थळे अधिकृत करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे अपेक्षित असल्याचे सांगून कृती समितीने आमदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत आमदारांची बैठक झाली.
धार्मिक स्थळाच्या प्रश्नावर सोमवारी मुख्यमंत्र्याशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 1:31 AM