सटाणा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाशवभूमीवर कॉंग्रेसच्या जनसंपर्कअभियानचा उत्तर महाराष्ट्रचे प्रभारी चेल्लार वामसी चांद रेड्डी यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.७) सटाण्यापासून शुभारंभ करण्यात आला. मात्र या कार्यक्र मात अभियानावर चर्चा होणे अपेक्षित असतांना धुळे लोकसभा मतदार संघाच्या तिकीटाभोवतीच चर्चा रंगली. यावेळी इच्छुक उमेदवार तथा मविप्रचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनाच तिकीट द्या अन्यथा बंड करू असा सज्जड दमच काही वक्त्यांनी दिल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.कॉँग्रेस सरकारने राज्यात गेल्या साठ वर्षात राबविलेल्या विकास योजना आणि मोदी सरकारने जनतेचा केलेला घोर विश्वासघात,राज्यात युती सरकारने जनतेची केलेली घोर फसवणूक प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी कॉंग्रेसने जनसंपर्कअभियान सुरू केले आहे. या अभियानचा शुभारंभ सटाणा येथून झाला. यावेळी कार्यक्र माच्या निमित्ताने आयोजित पदाधिकारी ,कार्यकर्त्यांच्या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये जिंकण्याच्या दृष्टीने व्यूहरचना व अभियानाच्या मूळ उद्देशावर चर्चा होणे सर्वांना अपेक्षित असतांना धुळे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरच चर्चा रंगली. कॉंग्रेसचे नगरसेवक दिनकर सोनवणे यांनी थेट पक्षाच्या तालुका नेतृत्वावरच हल्लाबोल करत कार्यकारिणी बदलल्याशिवाय कोणतीही निवडणूक जिंकणे अशक्य असल्याचे सांगून धुळ्याचे तिकीट डॉ.तुषार शेवळे यांना असेल तरच प्रचार करू असा इशारा दिला. नगरसेवक सोनवणे यांच्या सुरात सूर मिसळत जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रा.अनिल पाटील यांनी देखील डॉ.शेवाळेच योग्य उमेदवार असल्याची शिफारस केली. जेष्ठ पदाधिकारी भिका रौंदळ ,गुलाबराव मगर,वीरेंद्र अहिरे यांनी तर थेट धुळे लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक असलेले माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नावालाच विरोध केला. डॉ.शेवाळे यांना डावलून पाटलांना उमेदवारी दिल्यास आम्ही बंड करू असाही इशारा देण्यात आला. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी तर डॉ.शेवाळे यांच्या तिकिटासाठी उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी रेड्डी यांनाच साकडे घातले. कॉँग्रेस प्रभारींची मात्र चुप्पीउत्तर महाराष्ट्र प्रभारी रेड्डी यांनी मात्र धुळ्याच्या उमेदवारी बद्दल आपल्या भाषणातून बगल देण्याचा प्रयत्न केला. रेड्डी म्हणाले, बूथ रचनेचे काम योग्य पद्धतीने केल्यास उमेदवार कोणताही असल्यास विजय कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन करून जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून घराघरात पोहचून भावी पंतप्रधान राहुल गांधी यांचे हात बळकट करावे असे आवाहन केले.
कॉँग्रेसच्या अभियानात धुळ्याच्या तिकिटाचीच चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 5:58 PM
सटाण्यात शुभारंभ : शेवाळेंना डावलल्यास बंडाचा इशारा
ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्र प्रभारी रेड्डी यांनी मात्र धुळ्याच्या उमेदवारी बद्दल आपल्या भाषणातून बगल देण्याचा प्रयत्न केला.