नाशिक : मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात ३८ टक्केच जलसाठा असल्यामुळे पाणी वाटपाच्या समान न्यायाधिकरणाच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व नगर जिल्ह्यातील मुठा, निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा होत असलेल्या आग्रहावर सोमवारी औरंगाबादेत झालेल्या मराठवाडा-गोदावरी पाटबंधारे विभागाची बैठक होऊन त्यात गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर चर्चा झाली. नगर जिल्ह्णातून पाणी सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून या बैठकीवर दबाव टाकण्यासाठी नगर जिल्ह्यातील पुढारी व लोकप्रतिनिधींनी बैठकीला हजेरी लावली.सन २०१५ मध्ये अशाच प्रकारे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी सरकारवर दबाव टाकून नाशिक व नगर जिल्ह्णातून सुमारे १२ टीएमसी पाणी सोडण्याची वेळ आली होती. नाशिकच्या गंगापूर तर नगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आल्याने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तणाव निर्माण होऊन परिणामी सत्ताधाºयांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले होते. (पान ८ वर)यंदाही मराठवाड्यावर पावसाने अवकृपा केल्यामुळे जायकवाडी धरणात ३८ टक्केच जलसाठा असून, समान पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडीला आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध ठेवण्यासाठी नाशिक व नगरमधून पाणी सोडण्याचे संकेत दिले जात आहे. नाशिक दौºयावर आलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी त्या संदर्भातील सुतोवाच केल्याने त्यापार्श्वभूमीवर सोमवारी औरंगाबाद येथे मराठवाडा-गोदावरी पाटबंधारे विभागाची बैठक झाली.या बैठकीत नाशिक जिल्ह्णातील पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी जिल्ह्णातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या व विशेष करून गंगापूर, दारणा धरणातील पाण्याची आकडेवारी सादर केली. त्यात या पाण्यावर असलेल्या विविध संस्था, योजनांच्या आरक्षणाचीही माहिती देण्यात आली. पावसाळ्यात नाशिक जिल्ह्णातून जायकवाडीसाठी सुमारे २१ टीएमसी पाणी पोहोचल्याची माहिती यावेळी देण्यात आली, तर जायकवाडीचा मृतसाठा तसेच खरिपासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचा विचार करता, नाशिक व नगरमधून जेमतेत चार टीएमसी पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला. बैठकीत ठोस निर्णय नाहीया बैठकीत पाणी सोडण्याचा ठोस निर्णय घेण्यात आलेला नसला तरी, नाशिकच्या अधिकाºयांनी जी काही आकडेवारी सादर केली त्याचा अभ्यास केला जाणार असल्याचे पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग जमलेले असताना जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावर मराठवाड्याने डोळा ठेवला असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मात्र डोळ्यावर झापडे बांधले असून, सोमवारच्या बैठकीत नगर जिल्ह्यातील पुढाºयांनी उपस्थित राहून पाणी देण्याला विरोध केल्याचे सांगण्यात आले.
गंगापूर धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:46 AM
नाशिक : मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात ३८ टक्केच जलसाठा असल्यामुळे पाणी वाटपाच्या समान न्यायाधिकरणाच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व नगर जिल्ह्यातील मुठा, निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा होत असलेल्या आग्रहावर सोमवारी औरंगाबादेत झालेल्या मराठवाडा-गोदावरी पाटबंधारे विभागाची बैठक होऊन त्यात गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर चर्चा झाली. नगर जिल्ह्णातून पाणी सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून या बैठकीवर दबाव टाकण्यासाठी नगर जिल्ह्यातील पुढारी व लोकप्रतिनिधींनी बैठकीला हजेरी लावली.
ठळक मुद्देपाणी सोडण्यावर खल : नगरकरांचा पाणी देण्यास विरोध