कोविडमुळे अर्थकारणाची घडी विस्कटली आहे. उद्योजकांना देखील मोठा फटका बसला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी उद्योजक धडपड करीत आहेत. त्यासाठी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित असलेले प्रकल्प रखडलेले आहेत. त्यांना चालना देणे गरजेचे आहे. कायमस्वरुपी औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या मागणीचा प्रश्न निकाली काढणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रदर्शनासाठी जागा निश्चित केली होती. आता कार्यवाही संथावली आहे. उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून डीपीआर मंजूर करून काम सुरू करण्यात यावे, नाशिकला प्लेटिंग उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. प्लेटिंग उद्योगांसाठी सामायिक सांडपाणी प्रकल्प (सीईटीपी) दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. या प्रकल्पासाठी प्लेटिंग उद्योगांनी चार कोटी रुपयांचा निधी जमा करून ठेवला आहे. केवळ एमआयडीसी आणि एमपीसीबी यांच्यातील समन्वयाअभावी रखडलेल्या या प्रकल्पाला चालना द्यावी. कोरोना झालेल्या औद्योगिक कामगार रुग्णांना ईएसआयसीच्या माध्यमातून उपचार मिळालेत. परंतु ईएसआयसीने त्यांच्या रजा भरून दिलेल्या नाहीत. याबाबत लवकर निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा. यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष रंजन ठाकरे, निमा विश्वस्त मंडळाचे मंगेश पाटणकर, मनीष रावल, समीर पटवा, नितीन वागस्कर,राजेश गडाख, निखिल पांचाळ,विनायक गोखले,सुदर्शन डोंगरे,राजेंद्र अहिरे,रवींद्र झोपे आदींसह उद्योजकांनी उद्योग व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन दिले.
चौकट==
कोरोनामुळे पर्यटन उद्योगाला फटका
दरम्यान, आदिती ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पक्ष पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना कोरोनामुळे पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकला धार्मिक, ॲग्रो व मेडिकल पर्यटन वाढीची मोठी संधी असून, त्यासाठी आगामी काळात शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
(फोटो २१ उद्योग) उद्योग व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देताना निमा विश्वस्त मंडळाचे मंगेश पाटणकर,मनीष रावल,समीर पटवा,नितीन वागस्कर, राजेश गडाख,निखिल पांचाळ, विनायक गोखले,सुदर्शन डोंगरे,राजेंद्र अहिरे,रवींद्र झोपे आदी.